वर्धा,
wardha-news : छत्रपती संभाजी महाराज स्मारक हे वर्ध्याचं केवळ सौंदर्य नव्हे तर शहराचा स्वाभिमान, संस्कृती आणि शौर्याचं प्रतीक आहे. गांधीनगर येथील स्मारक परिसरात १७ रोजी रौद्रशंभो दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दिवाळीचा पहिला दिवा शंभूराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. सुमारे १५०० दिव्यांच्या तेजाने परिसर उजळून निघाला.
छत्रपती संभाजी महाराज समितीतर्फे शंभूतिर्थाचे प्रभावी प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. स्मारक परिसरात शंभूराजांच्या अटकेपासून बलिदानापर्यंतचा जीवनपट थ्रीडी इफेट आणि लेझर शोद्वारे सादर होणार आहे. नागपूर रोड ते बॅचलर रोडपर्यंतचे प्रवेशद्वार, रेखीव पथदिवे, भिंतीचित्रे, वाचनालय, व्यायामशाळा, खेळणी आणि पुतळा या माध्यमातून ‘शंभूतिर्था’ला एक अद्वितीय रूप लाभणार आहे.
या प्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यशस्वीतेकरिता महेश मूधोळकर, शिरीष बंड, संतोष लांगोरे, पुरुषोत्तम आष्टेकर, रामदास भांदक्कर, राजेंद्र मिस्कीन, शेखर मेघे, सुरेंद्र पावडे, अतुल पिसे, सुभाष खंताळे, प्रफुल्ल केणे, अविनाश किटे, योगेश मैत्रे, प्रवीण क्षीरसागर, राम जोशी, संदीप ठाकरे, डॉ. आशिष ठाकरे यांनी परिश्रम घेतले.