समुद्रपूर,
soybean-set-on-fire : यंदा अतिवृष्टी व सोयाबीनवर आलेल्या विविध रोगामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक निर्सगाने हिरावून घेतले. तालुयातील तावी येथील शेतकर्याने सोयाबीन होणारच नाही या भीतीने अडीच एकरातील सोयबीन चक स्वत:च्या डोळ्यासमोर आपल्या हाताने आगीच्या स्वाधीन केले.
तावी येथील प्रकाश बलकी या शेतकर्याने अडीच एकरात पर्हाटी तर अडीच एकरमध्ये सोयबीनची पेरणी केली. ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत पीक पिवळे पडले. शेंगा अर्धवट भरल्यामुळे सोयाबीनची कापणी केली. मात्र, मळणीचा खर्च निघणार नाही या भीतीने शेतकरी प्रकाश बलकी यांनी तळहाताच्या फोडा सारखे जपलेल्या अडीच एकरातील सोयाबीन पेटवून दिले.