धनत्रयोदशीला बाजारात कोटी- कोटींची उलाढाल

19 Oct 2025 14:49:12
नागपूर,
Dhanteras धनत्रयोदशीला इतवारीच्या सराफा बाजारात खरेदी करणार्‍यांची तुफान गर्दी दिसून आली. यंदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी शुक्रवार,१७ ऑक्टोंबरला सोन्याचे दर विक्रमी उंचीवर गेल्यानंतर ग्राहकांकडून खरेदी झाली. तर शनिवारी बाजारात सोने खरेदीसाठी तुफान गर्दी दिसून आली. यात प्रामुख्याने ग्राहकांनी चैन, मंगळसुत्र,अंगठी, हेअररिंगची सर्वाधिक खरेदी केल्याची माहिती ऑल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी कॉन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी दिली. 
 
 
 
Dhanteras
सोने खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी
दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारसला सोन्याचे दर आजपर्यंतच्या विक्रमी उंचीवर पोहचल्यानंतर दुसर्‍याच दिवशी धनत्रयोदशीच्या शुभ मुहर्तावर सोने- चांदीची कोटी- कोटींची उलाढाल झाली. इतवारीतील सराफा बाजारात वसु बारसच्या दिवशी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम जीएसटी मेकिंग शुल्क वगळून २४ कॅरेटसाठी १ लाख २८ हजार ५०० रुपये हेच दर दुसर्‍या दिवशी शनिवारी कायम होते. त्यामुळे दर वाढीचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. धनत्रयोदशीच्या मुहर्तावर २४ कॅरेट सोने खरेदीसाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली होती.
 
 
देवी- देवतांच्या मुर्तींची खरेदी
गत महिन्याभरापासून सोने- चांदीचे दर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र असताना सोने चांदी खरेदी करणारे ग्राहक कमी होण्याऐवजी सतत वाढताना येत आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठ्या प्रमाणावर लावलेल्या विविध करानंतर सोन्याचे दरात जास्तच वाढ झाली आहे. दरम्यान दिवाळीच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे दागिने तसेच लक्ष्मी देवी- देवतांच्या मुर्तीही खरेदी केल्या जात आहे.
 
 
चांदीच्या दरात घसरणदिवाळीच्या पूर्वी गुरुवारला चांदीचे दर प्रति किलो लाख ७८ हजार ९०० रुपये होते. तर शुक्रवारी वसु बारसला चांदीचे दर प्रति किलो १ लाख ६८ हजार ५०० रुपये होते. हे दर १८ ऑक्टोंबरला १ लाख ७० हजार ५०० रुपये नोंदवले गेले. तर शनिवार, १८ ऑक्टोबरला १ लाख ७० हजार ५०० रुपये होते. चांदीचे दर विक्रमी गतीने वाढल्यानंतर दरात घसरण झाली असली तरी सुध्दा गत महिन्याभरात चांदीच्या दराने विक्रमी नोंद केली आहे.
Powered By Sangraha 9.0