सुरेल स्वरांत रंगली ‘चांदणे शिंपीत जाशी’ मैफल

19 Oct 2025 15:20:56
नागपूर,
Diwali विदर्भाच्या मातीतील मराठी कवींच्या काव्याने बहरलेला ‘चांदणे शिंपीत जाशी’ हा कार्यक्रम डाॅ. गिरीश गांधी ाऊंडेशनच्या वतीने विष्णूजी की रसाेई येथे दिवाळीनिमित्त उत्साहात पार पडला.
 

Diwali 
विदर्भातील कवी, त्यांचे काव्य, काव्यजन्माच्या कथा, कवींचे किस्से सांगणारे बहारदार निवेदन आणि साेबत सुरेल स्वरातली गाणी यामुळे पहाटेच्या प्रसन्न वातावरणात ही मैफल उत्तराेत्तर रंगत गेली. कृषिअभ्यासक विजय जावंधिया, समीर सराफ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते. कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज, कवी बी, शरद मुठे, अनील, सुरेश भट, ग्रेस, राजा बढे, विठ्ठल वाघ आदी वैदर्भीय कवींची बहु असाेत सुंदर, जय जय महाराष्ट्र माझा हे राज्य गीत, आली लाजत, चाा बाेलेना, केव्हा तरी पहाटे, तुला पाहिले मी, भय इथले, चांदणे शिंपित जाशी, आनंद कंद, अजुनी रुसून आहे, मनी नाही भाव, राजास जी महाली, काळ्या मातीत, आला आला ेरीवाला, आज गाेकुळात रंग आदी गीते सादर करण्यात आली. उषःकाल हाेता हाेता या भटांच्या रचनेने कार्यक्रमाचा शेवट झाला. अंतरा वंजारी, कमलाकर मानमाेडे, मनाेहर टाेसर, प्रणाेती वंजारी, वनिता कुळकर्णी, श्रद्धा नंदरधने आदी गायक कलावंतांनी गाणी सादर केली. त्यांना हर्षल मानमाेडे, अनुप तायवाडे, शुभम मानमाेडे आदींनी विविध वाद्यांवर साथ केली.
धन्वंतरी जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
धन्वंतरी जयंती निमित्त श्री कलगीधर सत्संग मंडळाच्या वतीने जरीपटका येथील जी कुमार आरोग्यधाम येथे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी आ.कृष्णा खोपडे, राज्य माहिती आयुक्त गजानन भाजपा व्यापार आघाडीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, सदर विभाग संघचालक अनिल भारद्वाज, डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. रामचरण दुबे, दीपेन अग्रवाल, दादा माधवदास ममतानी, डॉ. ममतानी आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0