नांदगाव पेठ,
fake currency-amaravati रहाटगाव परिसरात उघडकीस आलेल्या बनावट चलनी नोटांच्या प्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी रविवारी आणखी दोन संशयितांना अटक करून ५७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली असून, या रॅकेटचा मास्टरमाईंड अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यासाठी वेगाने तपास सुरू आहे. fake currency-amaravati अटक करण्यात आलेले आरोपीत आदित्य रामेकर (रा. समर्थवाडी, रहाटगाव) व यश सतीश बर्वे (रा. दत्तवाडी, रहाटगाव) हे असून, आदित्य याच्याकडून तब्बल ४८ हजार रुपयांच्या, तर यश बर्वे याच्याकडून ९ हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

fake currency-amaravati याआधी पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून काही प्रमाणात बनावट चलनी नोटा जप्त केल्या होत्या. या सलग कारवाईंमुळे रहाटगाव परिसरातील बनावट नोटांच्या अवैध व्यवहारांवर पोलिसांनी मोठा आळा घातला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, या आरोपींनी बनावट नोटा स्थानिक बाजारात आणि किरकोळ व्यवहारांमध्ये वापरून चलनात आणण्याचा प्रयत्न केला होता. fake currency-amaravati बनावट नोटा बनविणार्यांचे धाबे दणाणले असून मोठे रॅकेट समोर येण्याची दाट शक्यता वर्तविला जात आहे. सदर कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात राजा राऊत, राजीक खान, निलेश साविकार, राजा सय्यद, वैभव तिखीले आणि अमित ढोले यांनी विशेष परिश्रम घेतले.
सखोल तपास सुरू
या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असून बनावट नोटा नेमक्या कोठे आणि कशा पद्धतीने तयार केल्या जातात, याचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीतून असे संकेत मिळाले आहेत की, यामागे एक संघटीत टोळी कार्यरत आहे. लवकरच या रॅकेटचा मास्टरमाईंड हाती लागेल. पोलिस गंभीरतेने कारवाई करत असून संपूर्ण रॅकेट लवकरच जेरबंद होईल.
- दिनेश दहातोंडे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नांदगाव पेठ