संग्रहालय अनिश्चित काळासाठी बंद
नवी दिल्ली,
france-louvre-museum-theft अवघ्या काही मिनिटांत संग्रहालयात अमूल्य वस्तूंची होणारी चोरी हा एखाद्या चित्रपटाचा विषय वाटतो. पण, पॅरीसच्या प्रसिद्ध आणि अनेक दुर्मिळ वस्तूंच्या लुव्र संग्रहालयात आज रविवारी अशीच थरारक चोरी झाली आहे. फक्त 7 मिनिटांत तिघांनी, लाकूड कापण्याचे चेनसॉ कटर वापरून ही थरारक चोरी केली आहे. अमूल्य जडजवाहिर घेऊन या चोरट्यांनी पलायन केले असून, संग्रहालय अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे.
france-louvre-museum-theft संग्रहालयाच्या एका बाजूला असलेली सीन नदीच्या काठावर बांधकाम सुरू आहे. तिथे माल वाहून नेणाèया लिफ्टने हे चोरटे संग्रहालयात शिरल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. कटरने खिडक्यांचे लाकडी दरवाजे कापून त्यांनी अति सुरक्षित कक्षात प्रवेश केला आणि चोरी केली. नंतर, हातातील कटर मिरवत ते संग्रहालयातून सुखरूप बाहेर पडले. चोरीची घटना रविवारी सकाळी 9.30 ते 9.40 दरम्यानची असून, त्यावेळी संग्रहालय सुरू होते.
france-louvre-museum-theft या कक्षाचे नाव अपोलो गॅलरी असून, तिथे फ्रांसच्या संस्कृतीचा ठेवा असलेले मोल्यवान दागिने ठेवलेले होते. त्यापैकी, चोरट्यांनी नेपोलियन युगातील 9 दागिने चोरले आहेत. फ्रांसच्या सांस्कृतिक मंत्री रचिडा दती यांनी समाजमाध्यमांवर या घटनेची माहिती दिली. संग्रहालयातील पर्यटकांमध्ये गदारोळ आणि पळापळ झाली. दरम्यान, या घटनाक्रमात कोणालाही इजा झालेली नाही.
दरम्यान, या चोरीच्या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पॅरिसच्या या प्रतिष्ठीत संग्रहालयाची स्थापना 10 ऑगस्ट 1793 रोजी झाली होती. तेव्हापासून या संग्रहालयात अनेकदा चोèया झाल्या आहेत. वर्ष 1911 मध्ये प्रसिद्ध अशा मोनालिसा पेंटींगची चोरीही याच संग्रहालयातून झाली होती.