समुद्रपूर,
Girad-Wardha-RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गिरड शाखेचा विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वते म्हणून धनंजय कुकडे होते तर गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका सेवाधिकारी विष्णू ब्राह्मणवाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर तालुका संघचालक रवी गाठे उपस्थित होते.
Girad-Wardha-RSS यावेळी मान्यवरांनी संघ स्थापनेपासून संघाने केलेल्या कार्याची माहिती देताना या वर्षीचा उत्सव विशेष म्हणजे संघाने आपल्या १०० वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाचा शताब्दी सोहळा साजरा केला. एक असा प्रवास ज्याने राष्ट्रभक्ती, संस्कार, संघटनशती आणि समाजसेवेचे अनोखे उदाहरण घालून दिले असल्याचे सांगितले. यावेळी अरुण मोटघरे, मोहन गिरडे, नुतन गिरडे, बहादुरसिंग अकाली, गिरडचे सरपंच राजू नौकरकर, मोहगावचे विलास नवघरे, ग्रापं सदस्य राहुल गाढवे, विहिंपचे निर्भय पांडे, रघुवीर पारधे, केशव घरत, सोनू गिरडे, कुणाल बंडे, निलेश बोदे, रोशन नौकरकर, आदींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.