नवी दिल्ली,
India missile test, भारताने आपल्या संरक्षण क्षमतेचा कस पाहण्यासाठी पुन्हा एकदा क्षेपणास्त्र चाचणीची तयारी सुरू केली आहे. ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत बंगालच्या उपसागरात ही संभाव्य चाचणी होणार असून यासाठी "नोटिस टू एअरमेन" (NOTAM) म्हणजेच हवाई क्षेत्रासाठी सावधगिरीचा इशारा जारी करण्यात आला आहे. यामध्ये संबंधित क्षेत्रात नो-फ्लाय झोन घोषित करण्यात आला असून कोणत्याही प्रकारचे हवाई वाहतूक संचालन या भागातून प्रतिबंधित करण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ही चाचणी भारतीय वेळेनुसार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंतच्या कालावधीत केली जाणार आहे. चाचणीदरम्यान सुमारे १५५ किलोमीटर लांबचा क्षेत्रफळ नो-फ्लाय झोन म्हणून निश्चित करण्यात आला आहे. या काळात कोणतेही विमान या मार्गावरून जाणार नाही, याची खबरदारी घेतली गेली आहे.
जरी संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी होणार आहे, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, तरीही तज्ज्ञांच्या मते ही चाचणी ही दीर्घ पल्ल्याच्या किंवा सामरिक क्षमतेच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या क्षेपणास्त्र चाचण्या भारताच्या रणनीतिक मारक क्षमतेत मोठी भर घालतात. या चाचणीद्वारे भारताची आत्मनिर्भर आणि अत्याधुनिक संरक्षण यंत्रणा अधिक सशक्त होण्याची अपेक्षा आहे.
गेल्या काही India missile test, महिन्यांपासून भारताने बंगालच्या उपसागरात सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. याआधी १५ ते १७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान देखील याच परिसरात चाचणी करण्यात आली होती, जिथे जवळपास १४८० किलोमीटर लांबीचा क्षेत्रफळ नो-फ्लाय झोन घोषित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे २४ आणि २५ सप्टेंबर रोजीही अब्दुल कलाम बेटावरून एक महत्त्वाची क्षेपणास्त्र चाचणी पार पडली होती.पाकिस्तानविरुद्ध अलीकडेच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने अशाच प्रकारच्या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा यशस्वी वापर केला होता. या क्षेपणास्त्रांनी शत्रूच्या लक्ष्यांवर अचूक निशाणा साधत त्यांचा संपूर्णपणे नायनाट केला होता. त्यामुळे भारताकडून करण्यात येणाऱ्या या नव्या चाचणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.भारताच्या या क्षेपणास्त्र चाचण्या फक्त सामरिक दृष्टीनेच महत्त्वाच्या नाहीत, तर त्या देशाच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पावले देखील आहेत. जागतिक पातळीवर भारताची संरक्षण क्षमता अधिक भक्कम करण्यासाठी अशा चाचण्या निर्णायक ठरत आहेत.