नवी दिल्ली
PM Modi speech पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारत आता दहशतवादी हल्ल्यांनंतर शांत बसत नाही, तर सर्जिकल स्ट्राईक, हवाई कारवाया आणि 'ऑपरेशन सिंदूर' सारख्या ठोस पावलांनी प्रत्युत्तर देतो. त्यांनी भारताच्या बदललेल्या सुरक्षानितीवर आणि देशाच्या आर्थिक, सामाजिक, आणि जागतिक स्तरावरील उभारणीवर भाष्य केले.पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आता जुन्या मानसिकतेतून आणि "मजबुरी"च्या राजकारणातून बाहेर पडून, आत्मविश्वासाने आणि ठामपणाने सुधारांच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांनी याआधीच्या सरकारांवर अप्रत्यक्ष टीका करत म्हटले की, पूर्वी सुधारणा केवळ गरज म्हणून केल्या जात होत्या, पण आता त्या दृढनिश्चयाने आणि दूरदृष्टीने केल्या जात आहेत.
मोदींनी सांगितले PM Modi speech की, जगाच्या पाठीवर अनेक अनिश्चितता आणि आव्हानं असतानाही भारताने प्रत्येक संधीचे रूपांतर विकासात केले. "आम्ही प्रत्येक संकटाला संधीमध्ये बदलले आहे आणि आज भारत जगातील प्रमुख पाच अर्थव्यवस्थांमध्ये सामील झाला आहे," असे त्यांनी अभिमानाने सांगितले.भारताच्या आर्थिक प्रगतीबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा जगात युद्ध आणि मंदीचे संकट गडद झाले, तेव्हा भारताने सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून स्वतःला सिद्ध केले. त्यांनी म्हटले की, एकेकाळी ‘फ्रॅजाईल फाईव्ह’मध्ये गणल्या जाणाऱ्या भारताने आता 'टॉप फाईव्ह' मध्ये स्थान पटकावले आहे."आज जेव्हा जगात वेगवेगळ्या प्रकारचे 'स्पीड ब्रेकर' आहेत, तेव्हा 'अनस्टॉपेबल इंडिया' ही संकल्पना जगभर चर्चेचा विषय बनली आहे," असे मोदी म्हणाले. त्यांनी आत्मनिर्भर भारताची संकल्पना पुन्हा एकदा अधोरेखित करत सांगितले की, “चिपपासून शिपपर्यंत, भारत प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे."
पंतप्रधान मोदी PM Modi speech यांनी भारताच्या डिजिटल यशाचा देखील उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, “डिजिटल फायनान्समध्ये भारताने आश्चर्यकारक यश मिळवलं आहे. आज जग भारताकडे विश्वासू, जबाबदार आणि सामर्थ्यशाली भागीदार म्हणून पाहतो.”लोकशक्तीवर विश्वास व्यक्त करताना त्यांनी भारताच्या यशाचे श्रेय जनतेला दिले. "भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे येथील जनता. जेव्हा सरकार जनतेवर बंधनं घालत नाही, तेव्हा ती आपल्या क्षमतेचा सर्वोच्च वापर करते," असे मोदींनी सांगितले.पंतप्रधान मोदींच्या या भाषणाने भारताच्या बदलत्या जागतिक प्रतिमेचा आणि अंतर्गत सुधारणा प्रक्रियेचा आढावा घेत जागतिक स्तरावर भारताची मजबूत वाटचाल अधोरेखित केली. ‘न थांबणारा भारत’ ही केवळ घोषणा नसून, १४० कोटी भारतीयांच्या सामूहिक प्रयत्नांची आणि दृढनिश्चयाची परिणती असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.