अमरावती,
murder-amaravati police शनिवार, १८ ऑक्टोबर रोजी नांदगाव पेठ पोलिस ठाणे हद्दीतील रहाटगाव शेतशिवारामध्ये एका व्यक्तीचा खून झाल्याची माहिती डायल ११२ वर प्राप्त झाल्याने गुन्हे शाखेचे पोलिस त्या ठिकाणी तात्काळ पोहचले. मृतक अनोळखी असल्यामुळे त्याची ओळख पटवून आरोपी शोधणे पोलिसांपुढे एक मोठे आव्हान होते. मात्र, पोलिसांनी १२ तासाच्या आत या प्रकरणाचा पर्दाफाश केला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदार नेमून खात्रीलायक माहिती काढली तेव्हा मृतकाचे नाव सैयद शाहरूख सैयद फारूक, वय ३४ वर्ष, रा. अकबर नगर अमरावती असे निष्पन्न झाले.
murder-amaravati police या खुनाबाबत कोणताही पुरावा नसतांना पीआय संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पीएसआय मनीष वाकोडे व पथकाने निरंतर सातत्याने कौश्यल्यपूर्ण तपास केला. मृतक हा अगोदरच्या दिवशी कोणासोबत होता, याबाबत सविस्तर माहिती असता अकबर नगरातीलच फारूख खान शमशेर खान उर्फ शाहरूख ब्लॅक हाच खुनी असल्याची माहिती मिळाली. दोघांनी दारू पिऊन वाद केल्याने हा खून घडल्याचेही प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. आरोपी हा रोकॉर्डवरील मोटरसायकल चोरी व इतर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असल्याने तो वारंवार आपले लोकेशन किंवा राहते ठिकाण बदलवित होता.
murder-amaravati police गुन्हे शाखेच्या पथकाने निरंतर व कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून आरोपीचा पाठलाग करून त्याला यवतमाळ जिल्ह्यातील भोसा रोड येथून त्याच्या सासूरवाडीतून ताब्यात घेतले. आरोपीला पुढील तपासाकरिता नांदगाव पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या करवाईत सायबरचे पीएसआय अनिकेत कासार, सायबरच्या पीएसआय प्रियंका कोटावार, पोलिस कर्मचारी सुनील लासूरकर, दीपक सुंदरकर, जहीर शेख, संग्राम भोजने, विकास गुडधे, सैयद नाझीम, राजीक रायलीवाले, रंजीत गावंडे, सागर ठाकरे, सूरज चव्हाण, प्रभात पोकळे, सायबरचे निखिल माहुरे व सायबरच्या सुषमा आठवले यांनी केली आहे.