आनंदवार्ता! अतिवृष्टी मदत निधीचा जीआर जारी

19 Oct 2025 16:05:15
नागपूर,
Nagpur heavy rainfall relief fund माहे सप्टेंबर महिन्यात आलेल्या अतिवृष्टी, पूर व सततच्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यात 87 हजार 169 हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले. बाधित शेतकèयांची संख्या 1 लाख 3 हजार 871 असून शेतकèयांना भरपाई मिळावी म्हणून महसूल विभागाने 114.64 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनास सादर केला. मात्र, नागपूर जिल्ह्यासाठी 112 कोटी 36 लाख अनुदान मंजूर झाले आहे. नुकसान भरपाई अनुदान शेतकèयांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहेत.
 
 
 

Nagpur heavy rainfall relief fund 
नागपूर जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकèयांचे आर्थिक गणितच कोलमडले. शेती, जमीन, जनावरे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या पावसाने शेतकèयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.
जिल्ह्यातील 13 तालुके बाधित झालेले आहेत. शेतपिकासह फळपिकांचे 33 टक्क्यांच्या वर 28 हजार 786 हेक्टर बाधित आहे तर शेतकèयांची संख्या 37 हजार 27 आहे. त्यासाठी 64.77 कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. कामठी, रामटेक, मौदा, कुही या चार तालुक्यात फळपिकांचे नुकसान झालेले नाही. जिल्ह्यातील 290.12 बागायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून बाधित शेतकèयांची संख्या 609 आहे. नुकसान भरपाईसाठी प्रशासनाने 4.93 कोटींचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 58092.55 हेक्टरवरील जिरायती क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान झाले होते. महसूल विभागाने 8500 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळावी म्हणून 4.93 कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. जिल्ह्यात 87 हजार 169 हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झालेले असून बाधित शेतकèयांची संख्या 1 लाख 3 हजार 871 इतकी आहे. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार 114.64 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनास सादर केला. मात्र, शासनाने 2 कोटींची कपात करून 112.36 कोटींचे अनुदान मंजूर केले. यासंदर्भात जीआर आजच जारी करण्यात आला. नुकसान भरपाई अनुदान थेट शेतकèयांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत नमूद आहे. त्यामुळे शेतकèयांची दिवाळी गोड जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0