पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण; घटनेचा VIDEO व्हायरल

19 Oct 2025 15:26:57
पुणे,  
namaz-offered-at-shaniwarwada पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यातील एक व्हिडिओ सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये काही मुस्लिम महिला शनिवारवाड्याच्या परिसरात नमाज पठण करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
 
 
namaz-offered-at-shaniwarwada
 
भाजपा  खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडिओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर करत थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “शनिवारवाड्यात नमाज पठण चालणार नाही; हिंदू समाज आता जागृत झाला आहे.” त्यांनी नागरिकांना आवाहन करत “चलो शनिवार वाडा” अशी हाक दिली असून, रविवार 19 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता कसबा पोलिस चौकीसमोर आंदोलन करून शिववंदना करण्याची घोषणा केली आहे. namaz-offered-at-shaniwarwada दरम्यान, या घटनेनंतर सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटनेकडूनही या प्रकाराचा निषेध करण्यात आला असून, दोन्ही संघटनांनी शनिवारवाड्याजवळ शिववंदनेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे एक मिनिट सहा सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये सहा ते सात महिला नमाज पठण करताना दिसतात. याचवेळी काही मुले खेळताना आणि पर्यटक परिसरात फिरताना दिसतात. हा व्हिडिओ शनिवारवाड्याच्या वरच्या भागातून शूट करण्यात आल्याचे दिसते आणि तो खरा असल्याचे प्रथमदर्शनी जाणवते.
सौजन्य : सोशल मीडिया 
मेधा कुलकर्णी यांनी प्रशासनावर सवाल उपस्थित करत म्हटले की, “सारसबागेत नमाज पठणानंतर आता शनिवारवाड्यातही अशी घटना घडणं हे प्रत्येक पुणेकरासाठी चिंतेचा आणि संतापाचा विषय आहे. namaz-offered-at-shaniwarwada पुणे प्रशासन नेमक काय करते आहे? आपल्या ऐतिहासिक वारसा स्थळांचा सन्मान कुठे हरवतोय?” त्यांनी पुढे सर्व पुणेकरांना एकत्र येऊन शिववंदना करण्याचे आणि आपल्या संस्कृतीचा सन्मान जपण्याचे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0