ऐतिहासिक! मातीचा गर्भातून उजळली प्राचीन संस्कृतीची 'ज्योत'

19 Oct 2025 12:09:37
उत्तर प्रदेश
Saharanpur ancient lamps ज्या वेळी संपूर्ण देशात दीपावलीच्या रात्री लाखो दिव्यांच्या प्रकाशात अंधार निघून जातो, त्याच वेळी उत्तर प्रदेशातील सहारनपूरची भूमी तिच्या गर्भात लपलेल्या त्या पुरातन प्रकाशाचा साक्षात्कार करत असते, ज्याने हजारो वर्षांपूर्वी या मातीला उजळवले होते. ही केवळ कल्पना नाही, तर पुरातत्त्वशास्त्रीय संशोधनातून समोर आलेली सत्य घटनाक्रमा आहे, जी सहारनपूरला भारताच्या सांस्कृतिक नकाशावर नव्याने अधोरेखित करत आहे.
 
 

Saharanpur ancient lamps  
शोभित विद्यापीठातील ‘युनिव्हर्सिटी हेरिटेज रिसर्च सेंटर’चे समन्वयक राजीव उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहारनपूर जिल्ह्यातील सरसावा भागातील एका टेकाडावरून सापडलेले दिवे सुमारे एक हजार वर्षांपूर्वीच्या गुर्जर प्रतिहार काळातील आहेत. त्याचबरोबर, तीतरो तालुक्यातील बरसी गावातून सापडलेले दिवे तब्बल चार हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दिव्यांचे आकार, त्यावरील कोरीव काम आणि रचना त्या काळातील कलात्मकता, धार्मिकता आणि जीवनशैलीचे प्रत्यक्ष चित्र उभे करतात.
 
 
बरसी गावाला यापूर्वी महाभारतकालीन श्री महादेव बरसी मंदिरासाठी ओळखले जात होते. आता, हेच गाव प्राचीन दिव्यांच्या मुळे पुरातत्त्वाच्या क्षेत्रातही एक नवा ठसा उमटवत आहे. यामुळे सहारनपूर जिल्ह्याची ओळख केवळ धार्मिक नाही, तर सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीनेही व्यापक होत आहे. या भागातील ही शोध मोहिम संपूर्ण उत्तर प्रदेशच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाची भर घालणारी ठरत आहे.या संशोधनात केवळ सिंधू किंवा गुर्जर प्रतिहार काळाचाच समावेश नाही, तर शामली जिल्ह्यातील जलालाबाद परिसरात कुषाण काळातील दिवे सापडले आहेत. सहारनपूरमधील गंगोह आणि सरसावा येथे उत्तर वैदिक कालीन वसाहतींचे अवशेष, मातीची भांडी, देवी-देवतांच्या नक्षीदार मूर्ती आणि सुमारे १५०० वर्षांपूर्वीची दुर्गामातेची प्रतिमा देखील सापडली आहे. हे सर्व पुरावे सध्या पुरातत्त्व विभागाच्या अभिलेखात नोंदवले गेले असून, यावर अभ्यास सुरू आहे.
 
 
इतिहासकारांचे असे मत आहे की, सहारनपूर हे प्राचीन सरस्वती नदीच्या प्रवाह क्षेत्राचा भाग होते. सरस्वती नदी लुप्त झाल्यानंतर आर्य समाजाने या भागात आपल्या तपश्चर्येची केंद्रे निर्माण केली. त्यामुळे ही भूमी केवळ सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नव्हे, तर प्रकाशाच्या सनातन प्रतीके म्हणूनही ओळखली जाऊ लागली.आज जेव्हा दीपावलीच्या रात्री घराघरांत दिवे लागतात, तेव्हा सहारनपूरच्या मातीत खोलवर दबलेले हे हजारो वर्षांपूर्वीचे दिवे जणू इतिहासाची उजळण बनून जागे होतात. ते आपल्याला हेच सांगतात की प्रकाशाचा हा उत्सव फक्त वर्तमानातला नाही, तर आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी रुजवलेल्या परंपरेची एक अमर साक्ष आहे, जी आजही या मातीत प्राणपणाने जिवंत आहे.
Powered By Sangraha 9.0