टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू

19 Oct 2025 11:07:00
गोंदिया, 
gondia-accident गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावर मुंडीपार ते मुरदोली दरम्यान टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. दिनेश अमरलाल पंधरे (३२) व देवेंद्र नेथूलाल उईके (३५) दोघेही राहणार बाघाटोला पोस्ट सावरी खुर्द जि. बालाघाट अशी मृतांची नावे आहे.
 
 
gondia-accident
 
प्राप्त माहितीनुसार दोन्ही मृतक हे नागपूर येथे रोजगारासाठी राहत होते. दरम्यान, दिवाळी निमित्त रविवारी पहाटे ते दुचाकी क्रमांक एम पी ५० झेड सी ६७९४ ने स्वगावी जाण्यासाठी निघाले असता सकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास नागपूर कडून गोंदियाकडे येत असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्पर क्र. एम एच.४० बीएल ७८७३ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. gondia-accident धडक एवढी भीषण होती की या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी टिप्पर ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0