नागपूर,
utsav-saptaparni धनत्रयोदशीची प्रसन्न सकाळ... बजाज नगर चौक ते शंकर नगर चौक मार्गावरच्या पहाटवाऱ्याला एव्हाना मंद मंद सुगंधाने कवेत घेतले होते...हवाहवासा हलका गारवा, त्यात धुंद दरवळ आणि सोबतीला सूर्याची कोवळी किरणे अशा अनोख्या वातावरणात आज सप्तपर्णीचा उत्सव या रस्त्यालगतच्या पदपथावरच रंगला. या वृक्षाचे माहात्म्य आणि त्याच्या फुलांच्या अंतरंगाचे पट उपस्थितांसमोर उलगडले गेले.
निमित्त होते दै. तरुण भारतच्या शताब्दीनिमित्त आयोजित ‘पावले ही फुलांची’ या उपक्रमाचे. आज या उपक्रमांतर्गत सप्तपर्णी नावाच्या झाडाचा आणि त्या झाडामुळे परिचित असलेल्या बजाजनगर ते शंकरनगर या मार्गाचाही उत्सव साजरा करण्यात आला. utsav-saptaparni कार्यक्रमात ऑरा कन्झर्वेशन पार्कचे संस्थापक अंबरीश घटाटे आणि पर्यावरणप्रेमी डॉ. वृंदा जोगळेकर यांनी सप्तपर्णीचे शास्त्रीय आणि पर्यावरणीय महत्त्व समजावून सांगितले आणि या झाडाचे आणि फुलाचे अंतरंग उपस्थितांसमोर उलगडले. पर्यावरणप्रेमी विश्वास सहस्रभोजनी याप्रसंगी विशेषत्वाने उपस्थित होते.
सप्तपर्णी अस्सल भारतीय- घटाटे
सप्तपर्णीबाबत अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत. हे झाड देशी नाहीच, असेही अनेकांना वाटते. utsav-saptaparni हा गैरसमज दूर करीत असताना, सप्तपर्णी हा अस्सल भारतीय वृक्ष असल्याचे अंबरिश घटाटे यांनी स्पष्ट केले. वनस्पती शास्त्राच्या भाषेत अॅल्स्टोनिया स्कॉलरिस या नावाने हा वृक्ष ओळखला जातो. लहानपणी आपण शाळेत असताना लिहिण्यासाठी जी पाटी वापरली जात होती, त्याच्या फ्रेम्स याच झाडाच्या खोडापासून तयार केल्या जात असत. एकप्रकारे ‘स्कॉलर’ लोक तयार करण्यात या झाडाचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले. या झाडाचे अनेक औषधी गुणधर्मही त्यांनी यावेळी विषद केले.
आसमंताकडे अधिक डोळसपणे पाहूया- डॉ. जोगळेकर
हल्लीच्या जीवनात असलेल्या घाईमुळे आपण आपल्या सभोवतालचा निसर्गही अनुभवत नाही. तरुण भारतच्या या उपक्रमामुळे आसपासचा आसमंत डोळसपणे पाहण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. utsav-saptaparni आज या उपक्रमाच्या निमित्ताने सप्तपर्णीच्या सुगंधापासून याची सुरुवात झाल्याचे डॉ. वृंदा जोगळेकर म्हणाल्या. या फुलांच्या उग्र गंधाचा कधी कधी काही लोकांना त्रासही होतो. फार जास्त झाडे असलेल्या ठिकाणीच तसे घडते, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाकवी रवींद्रनाथ ठाकूर यांनी पश्चिम बंगालमध्ये स्थापन केलेल्या विश्वभारती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात या झाडाची पाने पदवीच्या सोबत विद्वत्तेचे प्रतीक म्हणून देण्याची प्रथा होती. त्यामुळे याला पदवीचे झाड असेही संबोधिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सप्तपर्णीवर सुरेख कविताही त्यांनी सादर केली.
संत्रा झाडांची लागवड व्हावी- सहस्रभोजनी
तरुण भारतच्या उपक्रमामुळे सप्तपर्णीच्या झाडाबद्दलचे अनेक गैरसमज दूर होण्यास मदत झाल्याचे विश्वास सहस्रभोजनी यावेळी म्हणाले. नागपूरला आपण संत्रानगरी म्हणतो. परंतु संत्र्याचे एक साधे झाड शहरात दिसत नाही. शहरात रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना संत्र्याची झाडे लावली जावी. तसे झाले तर शहराच्या सौंदर्यात भर पडून खऱ्या अर्थाने नागपूरची संत्रानगरी ही ओळख सार्थ ठरेल, असेही ते म्हणाले.
जैवविविधतेसाठी आवश्यक- श्रीगौरी घटाटे
आयुर्वेदात द्रव्य गुणधर्माची महती सांगितली आहे. त्यातही या झाडाचा उपयोग सांगितला आहे. utsav-saptaparni या झाडाच्या फुलांना तीव्र गंध असतो. त्यामुळेच कीटकांर्माफत परागीकरणासाठी (पोलिनेशन) याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. या झाडाच्या माध्यमातून जैवविविधता साधली जात असल्याची माहिती श्रीगौरी घटाटे यांनी दिली.