वर्धा,
wardha-cattle-killing स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने गोपनीय माहितीच्या आधारे हिंगणघाट येथील रुग्णालय चौकात नाकेबंदीकरून कत्तलीसाठी जाणार्या १४ जनावरांची सुटका केली. दोघांना अटक करून २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
wardha-cattle-killing स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट हद्दीत गस्तीवर होते. दरम्यान, जामकडून हिंगणघाटकडे जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी रुग्णालय चौकात सापळा रचला. एका संशयित ट्रकला थांबवून पाहणी केली असता त्यात १४ जनावरे आढळून आली. मोहतशीम आलम मुक्तार अंन्सारी (४९), इम्रान खान मुस्ताक खान (३८) दोन्ही रा. कामठी जि. नागपूर यांनी ट्रक मालक फिरोज कुरेशी रा. कामठी याच्या सांगण्यावरून गोवंशांची वाहतूक करीत असल्याचे सांगितले. दोघांना अटक करून पोलिसांनी २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
wardha-cattle-killing ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, पोलिस अमलदार हमीद शेख, अमर लाखे, चंद्रकांत बुरगे, अमरदीप पाटील, सचिन इंगोले, भूषण निघोट, धर्मेंद्र अकाली, प्रमोद पिसे, अमोल नगराळे, मंगेश चावरे, सागर भोसले, दीपक साठे, मिथून जिचकार, राहुल अधवाल, रितेश गेटमे आदींनी केली आहे.