- प्रफुल्ल व्यास
वर्धा,
wardha-politics-ncp राजकीय घराणेशाही आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीतील संघर्षाचे प्रत्यंतर वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)गटात पुढे आले. माजी आमदार तथा सहकार महर्षी म्हणून ओळख असलेले सुरेश देशमुख यांचे सुपुत्र समीर यांना राजकारणात अद्याप यश आले नाही. पक्ष स्थापनेपासुन शरद पवार यांच्यासोबत जुळून असलेले सुरेश देशमुख यांची राजकीय सक्रियता आणि मोठे नाव असूनही (श.प.) गटाचे वर्धा जिल्हा अध्यक्षपदही समिर देशमुख यांना हुलकावनी देऊन गेले. यापूर्वी त्यांनी वर्धा लोकसभा आणि विधानसभेसाठीही प्रयत्न केले होते. परंतु, सावली सारखा उभा राहणारा सुधीर पांगुळ मित्रही ज्यांना जोपासता आला नाही त्यांचा राजकीय प्रवास असा उतरंडीकडे सुरू झाला आहे.
wardha-politics-ncp राजकारणात उतार चढाव सुरूच असतात. सुरेश देशमुख विधानसभेत एकदा विजयी तर वर्धा आणि हिंगणघाटात दोनदा आणि देवळीत एकदा असे पाच वेळा पराभूत झाले. त्यांना आपला वारसदारही ताकदीने उभा करता आला नाही हे उल्लेखनिय! दुसरीकडे हिंगणघाट येथील सामान्य कुटुंबातील, प्रामाणिक आणि सातत्याने कार्यरत असलेेले आणि कोणताही राजकीय वारसा नसलेले अतुल वांदिले यांच्या कार्यकुशलतेची दखल घेत शरद पवार यांनी वांदिले यांच्या खांद्यांवर जिल्हा अध्यक्षपदाची भकम जबाबदारी दिली. साध्या पृष्ठभूमीचा हा तरुण आता जिल्ह्यात पक्षाचे नेतृत्व करणार आहे. वर्धेत बापुरावजी देशमुख यांचे राजकीय वलय फार मोठे होते. त्यांची राजकीय उदारता सर्वश्रृत आहे. त्यांनी वर्धा जिल्ह्यात शाळांचे मोठे जाळे विणले.
wardha-politics-ncp सहकारी सुतगिरणी, साखर कारखाना आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाची निर्मिती केली. त्यांचा ५० टके वारसा सांभाळत सुरेश देशमुख एकदा आमदार झाले. त्यांचा राजकीय वारसा समीर यांच्याकडे आला. त्यांच्या हाती जिल्हा मध्यवर्ती बँक दिल्या गेली आणि बँक अवसायनात निघाली. हजारो शेतकर्यांचे करोडो रुपये आजही बँकेत अडकून आहेत. अभियांत्रिकीची जबाबदारी देण्यात आली. येथेही जवळपास १२५ कर्मचार्यांचे ६० महिन्याचे वेतन थकीत आहे. सुरेश देशमुख यांना राजकारणात बर्यापैकी मान होता. परंतु, तिसर्या पिढीतील समीर यांना सर्वात शेवटचे शरद पवार गटाचे अध्यक्षपदही मिळवता आले नाही.
wardha-politics-ncp आता खासदार अमर काळे आणि विदर्भाची धुरा सांभाळणारे अनिल देशमुख यांच्यावर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू झाला आहे. शरद पवार यांच्या आतल्या गोटात असताना लोकसभा, विधानसभा नव्हे जिल्हाध्यक्षपदही न दिल्याने देशमुख पितापुत्रांना चिंतनाची गरज आहे. वांदिले या युवा नेत्याने माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार राजू तिमांडे सारख्या दिग्गज राजकारण्यांना घाम फोडला हे मात्र तेवढेच सत्य!