संहितेच्या केंद्रस्थानी स्त्री व्यक्तीरेखा असाव्यात : प्रा. डॉ. सदानंद देशमुख

19 Oct 2025 18:31:46
बुलढाणा,
Sadanand Deshmukh विश्वातील अनेक कला महिलांनी शोधून काढल्या. शेतीपासून दागिन्यांपर्यंतच्या कलेचा शोध महिलांनीच लावला. मात्र कलाकृतीतून स्त्री जीवन आवश्यक प्रमाणात अभिव्यक्त होत नाही. नाटक करणार्‍यांनी व लिहीणार्‍यांनी ही उणीव भरुन काढावी व स्त्री व्यक्तीरेखेला केंद्रस्थानी ठेवावे, असे आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिक बारोमासकार प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांनी केले.
 

 Women in arts, female artists recognition, Prof. Dr. Sadanand Deshmukh speech 
अक्षरदेह नाट्यकला संस्थेच्यावतीने मी मुक्त मोरणी बाई या पुरस्कार प्राप्त नाटकातील महिला कलावंतांच्या सत्काराचा कार्यक्रम प्रा.डॉ. देशमुख यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ रंगकर्मी इंजि. गणेश बंगाळे हे होते. उदघाटक म्हणून वसुंधरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्वाती कन्हेर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दुर्गासिंग जाधव व वसुंधरा संस्थेच्या व्यवस्थापीका स्वाती बर्‍हाटे या उपस्थित होत्या. १६ ऑक्टोबरला बुलढाणा जिमखाना लबच्या मैदानात हा कार्यक्रम पार पडला.नटराज पूजन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी शैलेश वारे, संतोष पाटील, गणेश राणे, विलास मानवतकर, रुचिरा पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
कामगार कल्याण मंडळाच्या गटस्तरीय महिला नाट्य महोत्सवात अकोला, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यातून कामगार कल्याण केंद्र बुलढाणा यांनी सादर केलेल्या शशिकांत इंगळे लिखित व गणेश बंगाळे दिग्दर्शित मी मुक्त मोरणी बाई या नाटकाचा द्वितीय क्रमांक आला होता. फक्त महिलांनीच सादर केलेले हे पहिलेच नाटक असल्याने अक्षरदेह नाट्यकला संस्थेतर्फे या नाटकातील कलावंत व तंत्रज्ञांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रा. डॉ. सदानंद देशमुख व स्वाती कन्हेर यांच्याहस्ते कलावंत कल्याणी काळे, आशा मानवतकर, रुचिरा पाटील, प्राजक्ता कुलकर्णी, अश्विनी लोहगावकर, सुरेखा इंगळे, सविता सोनुने, पौर्णिमा साबळे, भारती बर्‍हाटे, सांची इंगळे तसेच रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, संगीत आणि प्रकाशयोजनेसाठी सुषमा गणेश राणे, वैष्णवी प्रेम अहेर, निकिता मोरे हिवाळे, अंकिता नाटेकर, शिवानी देशमुख यांचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नाटकाचे दिग्दर्शक गणेश बंगाळे, नाटकास सहकार्य करणारे जेष्ठ रंगकर्मी अण्णासाहेब जाधव, ऋषीश्वर चोपडे, कामगार कल्याण मंडळाचे बुलढाणा केंद्र संचालक नंदकिशोर खत्री, पत्रकार मृणाल सावळे, पत्रकार राजेंद्र काळे, साहित्यिक सुरेश साबळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना अक्षरदेहचे अध्यक्ष शशिकांत इंगळे यांनी कोणत्याही स्पर्धेत केवळ महिलांनीच सादर केलेले हे पहिलेच नाटक असल्याने हा ऐतिहासिक क्षण स्मृतीत रहावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. कलावंताच्यावतीने कु. भारती बर्‍हाटे यांनी तर कलावंत कुटुंबाच्यावतीने कल्पना कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल सावळे यांनी केले तर संतोष पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कर्नल सुरेश जतकर, अशोक कुलकर्णी, रंजना बोरीकर , सुरेखा सावळे, अलका बंगाळे, वनिता देशमुख, कृष्णा बोरीकर, श्रृती माने , कल्पना माने, छाया गवई,भक्ती लहाने, पंकज लोहगावकर, तेजराव बर्‍हाटे, अविनाश सोनुने, विशाल गवई यांच्यासह नाट्यकर्मी बहुसंख्येने उपस्थित होते. सृजन इंगळे, चिन्मय राणे, सिध्दी पाटील, गौरी राणे, स्वरा मानवतकर, वल्लभ पाटील, वेदांत मानवतकर यांनी परीश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0