अभाविपतर्फे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स मिटचे आयोजन

20 Oct 2025 18:29:28
वर्धा, 
social-media-influencers-meet अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने स्थानिक शासकीय विश्रामगृहात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स मिटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोशल मीडियाशी संबंधित अनुभव, ज्ञान, आव्हाने आणि यशस्वी प्रयत्न यावर चर्चा करण्यात आली. तसेच येणार्‍या विद्यापीठ मोर्चा संदर्भात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची भूमिका, त्यांचे योगदान आणि प्रभावी सोशल मीडिया स्ट्रॅटेजीवरही विचारमंथन झाले.
 
 
social-media-influencers-meet
 
कार्यक्रमाला विदर्भ प्रांत उपाध्यक्ष व वर्धा विभाग प्रमुख प्रा. राजेश लेहकपुरे, विदर्भ प्रांत सोशल मीडिया सहसंयोजक व आर्वी नगर विद्यार्थी विस्तारक हर्ष वानखडे, वर्धा नगर विद्यार्थी विस्तारक जय शिंदे, वर्धा विभाग संयोजक व प्रांत छात्रावास प्रमुख अभिषेक द्विवेदी, वर्धा जिल्हा मीडिया संयोजक रजत बत्रा, वर्धा जिल्हा संयोजक शिवम काळे, वर्धा नगर सहमंत्री अपेक्षा वाकडे आणि वर्धा नगर सहमंत्री बादल लोखंडे यांच्यासह शहरातील नामांकित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स वर्धावॉव, डॉ. ब्लॉगर, आपण वर्धाकरी, मेरा हिंगणघाट, मेरा वर्धा, पायल ठाकरे, विवेका पारवे, श्वेता नागतोडे, तळेगाव वॉव, ड्रीम्स वर्धेकर आदींची उपस्थिती होती. social-media-influencers-meet मिट दरम्यान इन्फ्लुएन्सर्सचा सत्कार करण्यात आला. येणार्‍या विद्यापीठ मोर्चा संदर्भात त्यांच्या सूचना व मार्गदर्शन घेण्यात आले. या चर्चेत सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी विषयक मुद्दे अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवण्याच्या विविध कल्पना व उपक्रमांवरही भर देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थी वर्गात सोशल मीडियाच्या जबाबदारीची जाणीव निर्माण होऊन आगामी उपक्रमांना बळकटी मिळेल, असा विश्वास व्यत करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0