बंपर खरेदीचा रविवार

20 Oct 2025 14:06:41
नागपूर, 
diwali shoping प्रत्येकाच्या जीवनात प्रकाशपेरणी करीत येणाऱ्या दिवाळीला प्रत्येकच जण सेलिब्रेट करीत असताे. त्यामुळे कपडे, इलेक्ट्राॅनिक्स साहित्य व सजावटीच्या वस्तूसह इतरही साहित्य खरेदी करण्यासाठी नागपूरकरांचा आठवडाभरापासून असलेला उत्साह रविवारी शिगेला पाेहाेचला. मंगळवारी असलेल्या लक्ष्मीपूजनासाठी ग्राहकांनी आज बंपर खरेदी केली. सकाळपासूनच सीताबर्डी, खामला, महाल, इतवारी, गांधीबाग, धरमपेठ, सदर, सक्करदरा, जरीपटका, मानेवाडा या प्रमुख भागांमध्ये ग्राहकांची गर्दी पहावयास मिळाली. रात्री उशीरापर्यंतही रस्ते खरेदीसाठी गजबजले हाेते.
 
 

diwali shopping 
 
 
दिवाळीत कपडे, मिठाई, फराळाचे साहित्य, सजावटीच्या वस्तू, विविधरंगी सिरीज, आकाशदिवे गृहाेपयाेगी साहित्य यासह इलेक्ट्राॅनिक खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा असताे. वेळेची अडचण व इतरही कारणांमुळे अखेरच्या रविवारी खरेदी करण्याची वेळ अनेकावर येते. त्यामुळेच आजचा वार खरेदी रविवार ठरला. खास करून कपडे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल हाेता. अनेक कुटुंबांनी एकत्रित खरेदीचा आनंद घेतला. माेठमाेठ्या प्रति ष्ठानांसह, लहान दुकाने आणि रस्त्याच्या कडेला खरेदीसाठी महाल परिसर गजबजला हाेता. महिलांनी पारंपरिक व नव्या स्टाईलच्या साड्या, युवतींनी लेहेगा, कुर्ती, पुरुषांनी व युवांनी बंगाली कुर्ता तर लहान मुलांसाठी फॅन्सी कपडे खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. एकूनच रविवारी खरेदीचा आनंद नागपूरकरांनी घेतला.
---------
वार्म यलाेे आणि विविधरंगी प्रकाशदिव्यांना मागणी
घरांवर राेषणाई करण्यासाठी खास वार्म यलाे प्रकारातील सिरीजला पसंती असल्याचे सीताबर्डी आणि गांधीबाग येथील विक्रेत्यांनी सांगितले. यासह घरातील प्रवेशद्वार, गॅलरी, खिडक्यांना सजविण्यासाठी विविधरंगी सिरीजला मागणी हाेती. स्मार्ट एलईडी सिरीज, रिमाेट कंट्राेल दिवे, साेलर पाॅवर लॅम्प्स, वाॅटरप्रूफ स्ट्रिंग लाइट्स आणि रंग बदलणारे डेकाेरेटिव्ह दिवे, बाॅटलमधील प्रकाशदिवे ग्राहकांच्या पसंतीस उतरले.

----------
बर्डी मार्केट पुन्हा हाऊसफुल
गेल्या काही महिन्यांपासून  फेरीवाल्यांना बर्डीतील मुख्य मार्गावर खरेदीस मनाई करण्यात आली आहे. यामुळे येथील बाजारावर काय फरक जाणवताेय याबाबत आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता, सीताबर्डी मर्चंट असाेसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गुप्ता सांगतात, बर्डी मार्केटने माेकळा श्वास घेतल्याने येथील पारंपारिक कपडा मार्केटमध्ये नवचैतन्य आले आहे. बर्डीचा जुना ग्राहक पुन्हा खरेदीसाठी येत असून यंदा या आठवडाभरात केवळ कपडा खरेदीत 8 ते 10 काेटींची उलाढाल झाल्याचे गुप्ता सांगतात. दिवाळी निमित्त फेरीवाल्यांनाही प्रशाननाने सूट दिल्याचे दिसून आले.
----------
दिवे आणि केरसुणी खरेदीची लगबग
दिवाळी हा दिव्यांचा उत्सव. त्यामुळे पारपारिक दिव्यांच्या खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली. साेबतच विविध रंगांनी सजलेल्या पणत्यासह इलेक्ट्राॅनिक दिव्यांचीही मागणी आहे. घराची स्वच्छता करणाèया केरसुणीला लक्ष्मी संबाेधले जाते. त्यामुळे केरसुणी आणि पारंपारिक झाडूला मागणी आहे. तसेच देवघराची स्वच्छता करण्यासाठी उपयाेगात येणाèया लहान केरसुणीदेखील आवर्जून घेतल्या जात आहेत.
-----------
ऑफर्सची खरेदी
दिवाळीसाठी विविध इलेक्ट्रिक दुकानांनी ेस्टिव्हल सेलिब्रेशन ऑफर्स’, ’खरेदी करा आणि बंपर गिफ्ट मिळवा’ अशा आकर्षक याेजना जाहीर केल्या आहेत. यामुळे एलसीडी टीव्ही, वाहने, मिक्सर, ओवन, पंखे, ्रीज, ूड प्राेसेसर, ज्यूसर आदी गृहाेपयाेगी वस्तुंची ऑफरवर खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली. माेबाईल, लॅपटाॅप, टॅब आदी साहित्यही माेठ्या प्रमाणात विकल्या गेल्याचे विक्रेते सांगतात.
--------
फटाक्यात ‘पाॅप अप’चा जलवा
यावर्षी फॅन्सी फटाक्याची धूम आहे. विशेष करुन लहान ुलांमध्ये ‘पाॅप अप’, टीपटाॅप, हेलिकाॅप्टर, स्माेक फटाका, तिडतिडी आणि रंगीत चक्रीची मागणी वाढली आहे. माेठ्या आवाजाच्या फटाक्यांऐवजी लहान आवाजाचे आणि फॅन्सी आणि रंगीत उजेड देणारे फटाक्यांची विक्री सर्वाधिक झाली. आकाशात उडणारे फटाके आणि राॅकेट या फटाक्यांनी माेठ्यांनी पसंती दर्शवली आहे. फटाक्यांवर महागाईचा परिणा दिसत असून फटाक्यांचा माेठा साठा वाचण्याची शक्यता आहे, अशी माहिती विक्रेता प्रवीण वानखडे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0