धनवटे नॅशनल काॅलेज मधील माेडी लिपी प्रशिक्षणाचा समाराेप

20 Oct 2025 14:39:41
नागपूर,
modi script training धनवटे नॅशनल काॅलेजमधील इतिहास विभाग आणि महाराष्ट्र शासन पुराभिलेख संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दहा दिवसीय माेडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयाेजन करण्यात आले हाेते. नुकताच या वर्गाचा समाराेप झाला. या प्रशिक्षण वर्गात शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक अशा एकूण 47 इतिहासप्रेमी अभ्यासकांनी सहभाग नाेंदविला.
 

धनवटे कॉलेज  
 
 
समाराेपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. प्रशांत काेठे उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे संयाेजक व इतिहास विभाग प्रमुख डाॅ. अमाेल ढाेबळे हाेते. पुराभिलेख संचालनालयाचे संशाेधन सहायक प्रशिक्षक मनाेज मरस्काेल्हे,फिराेजखान रशिदखान पठाण, यांनी माेडी लिपीबाबत मार्गदर्शन केले.modi script training पुढील पिढीला या प्रशिक्षणातून लाभलेले ज्ञान पाेहाेचवण्याची आणि माेडी लिपीचा प्रसार आणि प्रचार अधिक करून खरा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत तसेच वाचकांपर्यंत पाेहाेचविण्यास मदत मिळणार असल्याचे डाॅ. ढाेबळे यावेळी म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0