दत्तयाग पूर्णाहुती देताना दाम्पत्य

20 Oct 2025 15:01:49
नागपूर,
datta yaga अखिल भारतीय त्रिपदी परिवार, नागपूर शाखा तसेच कलासंगम आणि केशवनगर सांस्कृतिक सभा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दत्त जयंती हिरक महाेत्सव आणि डाॅ बाबासाहेब तराणेकर यांच्या अमृत महाेत्सवी वर्षानिमित्त रविवारी रेशिमबाग बगीच्यात भव्य श्रीदत्तयाग आयाेजित करण्यात आला हाेता. 25 दाम्पत्यांनी यावेळी एकत्रित रित्या दत्तयाग पूर्णाहुती दिली.
 

दत्तयाग  
 
 
याप्रसंगी विदर्भ सहसंघचालक श्रीधर गाडगीळ, त्रिपदी परिवाराचे राजाभाऊ हिंगवे, केशवनगर सांस्कृतिक सभेचे अध्यक्ष किशाेर धाराशिवकार, सुनील काशीकर, कलासंगम अध्यक्ष अमर आकरे, रवी ढाेके, लाेकजागृती माेर्चाचे रमण सेनाड, कीर्तनकार दिगंबरबुआ नाईक, देवेंद्र दस्तुरे, नंदनवन भाग संघचालक अशाेक बुजाेने, डाॅ जयंत इट केलवार, सक्षम चे अध्यक्ष डाॅ मिलिंद हरदास आणि रेशिमबाग येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित हाेते.datta yaga कलासंगम येथे याच ठिकाणी नरक चतुर्दशी च्यापर्वार्वर कीर्तन पहाट आणि लक्ष्मी पूजनच्या शुभ मुहूर्तावर पहाट वारा कार्यक्रमांचे आयाेजन सकाळी 6 वाजता करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0