नागपूर,
disabled students डॉ. आंबेडकर महाविद्यालयात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट आणि बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर, उपप्राचार्या हर्षा बोरकर, तसेच प्रमुख अतिथी नयनलाल ऊके, सोनल राऊत, आणि दिपेश टेंभुर्णीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि पर्यवेक्षण स्पोर्ट्स इंचार्ज प्रा. कुणाल पाटील यांनी केले. कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. विकास सिडाम सुद्धा उपस्थित होते. disabled students प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांचे मनोबल वाढविले. स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि कार्यक्रम यशस्वी झाला.
सौजन्य: प्रफुल ब्राम्हणे, संपर्क मित्र