नागपूर,
netaji flower bazaar शहरात दिवाळसणाची लगबग चांगलीच वाढली आहे. पूजेसह सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांनी नेताजी फुलबाजार सजला आहे. यंदा झेंडू, शेवंती आणि कमळुलांची विक्रमी विक्री हाेत असल्याचे येथील विक्रेते मनमीत पिल्लारे यांनी सांगितले.
लक्ष्मीपूजनासाठी घराेघरी ताेरणे, फुलांच्या माळा आणि रंगीबेरंगी रांगाेळ्यांची तयारी सुरू असून, उत्तम दर्जाची फुले मिळावीत म्हणून ग्राहक सकाळीच बाजारात दाखल हाेत आहेत. घाऊक आणि किरकाेळ दाेन्ही विक्री केंद्रांवर प्रचंड गर्दी पहावयास मिळत आहे. विविध रंगांत उपलब्ध असलेल्या झेंडूच्या माळांना महिलांकडून सर्वाधिक पसंती मिळाली.netaji flower bazaar शेवंती व गुलाबाची मागणीही प्रचंड वाढली आहे. लक्ष्मीपूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या कमळफुलांच्या दरात तर लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. या भरघाेस खरेदीमुळे स्थानिक शेतकऱ्यांना माेठा आर्थिक आधार लाभला आहे. घाऊक भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. फुलबाजारातील व्यापाऱ्यांच्या मते, यंदाची मागणी गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक आहे. त्यामुळे फुलबाजार आनंदाने दरवळला आहे.