विदर्भाच्या आयुर्वेद संशोधनाला भारत सरकारचा गौरव

20 Oct 2025 15:24:37
नागपूर,
Datta Meghe Ayurveda Medical College दत्ता मेघे आयुर्वेद मेडिकल कॉलेज येथील सहयोगी प्राध्यापक व विश्वकुंभ आयुर्वेद चिकित्सालयचे डॉ. संतोष पुसदकर यांनी आयुर्वेद शास्त्राच्या विविध शाखांवर सखोल संशोधन करून तयार केलेल्या सहा विषयांवरील मौलिक साहित्याला भारत सरकारच्या कॉपीराइट कार्यालयाकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. ही मान्यता विदर्भातील आयुर्वेद संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली एक मोठी पावती मानली जाते.
 
nagpur
 
डॉ. पुसदकर यांनी संशोधित केलेले विषय आयुर्वेदातील मूलभूत सिद्धांत, रसशास्त्र आणि भैषज्य कल्पना या प्रमुख अंगांशी संबंधित असून, हे साहित्य शिक्षण, संशोधन आणि वैद्यकीय व्यवहारासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या अनेक लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले असून, आयुर्वेद संशोधन क्षेत्रात त्यांचे कार्य अत्यंत प्रशंसनीय ठरले आहे. Datta Meghe Ayurveda Medical College लोकसहभागातून आयुर्वेदाच्या प्रसारासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या डॉ. पुसदकर यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत, मुंबई इंडियन्स (IPL) संघाचा खेळाडू आणि विदर्भ रणजी संघाचा प्रमुख गोलंदाज अक्षय वखरे यांनी त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन केले. हा क्षण आयुर्वेद आणि क्रीडा क्षेत्राच्या अभिन्न समन्वयाचे प्रतीक ठरला.
सौजन्य: सारंग टोपरे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0