दिवाळीनिमित्त दिव्यांगांना साहित्याचे वाटप

20 Oct 2025 18:20:24
वर्धा, 
distribution-of-materials-to-disabled राष्ट्रीय दृष्टिहीन संघ द्बारा आयोजित दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ, वर्धा नागरी सहकारी अधिकोष बँक वर्धा व न्यू इंग्लिश अकॅडमी ऑफ जिनिअस वर्धा येथील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संयुत वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल दिव्यांग परिवाराला किराणा किट, महिलांना साडी व अंध व्यतींना काठी आदी साहित्यांचे वितरण करण्यात आले.
 

distribution-of-materials-to-disabled 
 
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, दत्ता मेघे अभिमन विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. श्वेता पिसुळकर, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे अध्यक्ष रघुनाथ बारड, प्रसिद्ध व्यावसायिक महेश गुल्हाने, प्राचार्य डॉ. देवेंद्र गुजरकर यांची उपस्थिती होती. distribution-of-materials-to-disabled यावेळी महेश गुल्हाने, कुलसचिव डॉ. श्वेता पिसुळकर, देवदत्त नरोटे, डॉ. देवेंद्र गुजरकर, प्राचार्य साधना पवार, मकरंद उमाळकर यांनी भरीव आर्थिक मदत दिली. संचालन पल्लवी पुरोहित यांनी केले तर आभार नरेंद्र नरोटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी संजय तिगावकर, पांडूरंग भालशंकर, विवेक डोंगरे, दिव्या पाटील, सुजाता भालशंकर आदींनी सहकार्य केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे उपाध्यक्ष भोजराज पाटील यांनी पार पडली.
Powered By Sangraha 9.0