जोरदार शाब्दिक चकमक! 'ट्रम्प-झेलेन्स्की' भेटीचा वादळी शेवट...

20 Oct 2025 09:05:33
वॉशिंग्टन,
Donald Trump Zelensky अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये नुकतीच झालेली बैठक अत्यंत तणावपूर्ण आणि वादळी ठरली. युक्रेनला रशियाविरुद्धच्या लढाईसाठी अमेरिकेकडून आधुनिक शस्त्रास्त्रांची मदत मिळावी, या अपेक्षेने आलेल्या झेलेन्स्की यांना ट्रम्प यांनी शांततेचा आणि प्रत्यक्ष शरणागतीचा सल्ला दिला.
 
 

Donald Trump Zelensky  
या सुमारे दोन Donald Trump Zelensky  तास चाललेल्या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा जोरदार शाब्दिक चकमकी झाल्याचे वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’ने दिले आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत झेलेन्स्की यांना सांगितले की, युक्रेन हे युद्ध हरत आहे आणि त्यांनी रशियाच्या अटी मान्य करून तातडीने युद्ध थांबवले पाहिजे. बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी रागाने नकाशा बाजूला फेकत डोनबास प्रदेश रशियाच्या ताब्यात देण्याची सूचना केली.
 
 
झेलेन्स्की हे युक्रेनसाठी अमेरिकेकडून टॉमहॉक क्षेपणास्त्रांची मदत मिळावी, या उद्देशाने अमेरिकेला भेट देण्यासाठी आले होते. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी युक्रेनला मदत करण्याचा विचार असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, प्रत्यक्ष भेटीत त्यांनी झेलेन्स्की यांची मागणी फेटाळून लावत, "माझे लक्ष आता शांतता करारावर आहे, युक्रेनची लष्करी शक्ती वाढवण्यावर नाही," असे ठामपणे सांगितले.या बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी युक्रेनने रशियाच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर पुतिन यांच्यात युक्रेनला "पूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता" असल्याचा इशाराही दिला. त्यांच्या या विधानाने उपस्थित अधिकाऱ्यांमध्येही अस्वस्थता पसरल्याचे वृत्त आहे.
 
 
 
या पार्श्वभूमीवर Donald Trump Zelensky  ट्रम्प येत्या काही आठवड्यांत हंगेरीमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेच्या वेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार असून, त्या बैठकीत शांतता करारावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी बैठकीदरम्यान सांगितले.बैठकीच्या शेवटी ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी जिथे लढाई सुरू आहे, तिथेच थांबावे आणि तातडीने रक्तपात थांबवावा, असे आवाहन केले. मात्र, झेलेन्स्की यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. व्हाईट हाऊसमधून निघताना त्यांचा चेहरा निराशाजनक असल्याचे निरीक्षकांनी नमूद केले.या बैठकीमुळे अमेरिकेच्या युक्रेनविषयक धोरणात मोठा बदल होण्याची शक्यता असून, युद्धग्रस्त युक्रेनसाठी हा एक धक्का मानला जात आहे.
Powered By Sangraha 9.0