पश्चिम बंगालमध्ये बनावट पासपोर्ट रॅकेटचा पर्दाफाश

20 Oct 2025 13:51:22
कोलकाता,
Fake passport racket busted पश्चिम बंगालमध्ये बनावट पासपोर्ट रॅकेटचा मोठा पर्दाफाश करण्यात आला असून, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सात पाकिस्तानी नागरिकांना या प्रकरणात लक्ष्य केले आहे. या रॅकेटद्वारे बनावट भारतीय पासपोर्ट तयार करून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करण्यात आला होता. तपासात असे उघड झाले की या रॅकेटचा प्रमुख तांत्रिक ऑपरेटर इंदू भूषण हलदर नादिया जिल्ह्यातील चकदाहा येथून अटक करण्यात आला असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे. तपासात असेही समोर आले की हलदर हा आणखी एका पाकिस्तानी नागरिकाशी संपर्कात होता, जो या सात संशयितांसह मध्यस्थी करीत होता.

Fake passport racket busted
 
या रॅकेटद्वारे बनावट पासपोर्ट मिळवण्यासाठी मुलिक नावाचा पाकिस्तानी नागरिक बांगलादेशी ओळखपत्र वापरून भारतीय नागरिक बनत होता आणि कोलकाता येथील भाड्याच्या घरातून हवाला व्यवसाय आणि बनावट पासपोर्टची विक्री करीत होता. ईडीच्या माहितीनुसार, हलदरने अंदाजे २५० बनावट पासपोर्ट तयार केले असून, त्यामध्ये या सात पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. या रॅकेटद्वारे अंदाजे २ कोटी रुपये कमावले गेले आहेत. काही अहवालांमध्ये हलदरवर बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांसाठी ३०० हून अधिक पासपोर्ट बनवल्याचा आरोप आहे.
 
गेल्या वर्षी पश्चिम बंगाल पोलिसांनी या रॅकेटचा प्राथमिक पर्दाफाश केला होता आणि १२० बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांसह १३० आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. मुलिकची अटक ही ईडीसाठी मोठी प्रगती मानली जात आहे, आणि लूकआउट नोटिस जारी करून तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0