जालन्यातील शेतकऱ्याची दिवाळीच्या दिवशी आत्महत्या

20 Oct 2025 14:09:51
जालना,
Farmer commits suicide on Diwali जालन्यातील शेवगा गावात दिवाळीच्या दिवशी हृदयद्रावक घटना घडली. रामेश्वर खंडागळे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. यंदा मुसळधार पावसामुळे आणि संततधार पावसामुळे त्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले, ज्यामुळे उत्पन्न जवळजवळ शून्य झाले. आर्थिक संकटामुळे हातात पैसे नसल्याने शेतकऱ्याच्या घराचा उदरनिर्वाह करताना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत होता. दिवाळीच्या सणावर मुलांना कपडे आणि फटाके घेण्याची इच्छा पूर्ण न होऊ शकणे याने रामेश्वर खंडागळे भावनिकदृष्ट्या खचून गेले होते.
 
Farmer commits suicide on Diwali
 
त्यांनी घरात चिठ्ठी लिहून "माझ्याकडे पैसे नाहीत, अनुदान आल असत तर दिवाळी झाली असती. मी चाललो, मला माफ करा असे शब्द लिहिले. त्यानंतर शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन त्यांनी आपले जीवन संपवले. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृताच्या चिठ्ठी जप्त केली आहे. पोलिस सध्या घटनेच्या कारणांचा सखोल तपास करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाला मोठा आघात बसला आहे.
Powered By Sangraha 9.0