सोने-चांदीचे भाव वाढल्यानंतरही खरेदीकडे ग्राहकांचा ओढा कायम

20 Oct 2025 13:07:39
नागपूर,
gold-and-silver-prices केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक वस्तू स्वस्त झाल्यात. तर सोने-चांदीचे भाव वाढल्यानंतरही ग्राहकांचा खरेदीकडे ओढा विक्रमी वाढला आहे. शहरातील इतवारीतील सराफा बाजार, गांधीबाग, महाल, सक्करदरा, बेसा, मानेवाडा रोड, खामला, मेडीकल चौक, सीताबर्डी, धरमपेठ, गोकुळपेठ, सदर, जरीपटका, कमाल चौक आदी ठिकाणी असलेल्या सोने-चांदीच्या शोरुममध्ये सुध्दा खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून आली.
 
gold-and-silver-prices
 
मुख्यत: सोने विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतरही रविवारी सार्वधिक प्रमाणात सोने-चांदीची विक्री झाल्याची माहिती ऑल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी कॉन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्यात ५० हजारांची दरवाढ झाली तरी सुध्दा धनत्रयोदशीला ग्राहकांनी प्रचंड गर्दी करीत खरेदी केले. रविवार, १९ ऑक्टोबर व १८ ऑक्टोबर धनत्रयोदशीला २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीविना १,२८,५०० रुपये आणि गेल्या वर्षी ७८,४०० रुपयांवर होते.  gold-and-silver-pricesअर्थात वर्षभरात ५०,१०० रुपयांची वाढ झाली असताना ग्राहकांनी ज्वेलर्सकडे सोने व चांदीची दागिणे, नाणे, बांगड्या, भांडी आणि भेटवस्तूंची खरेदी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली.
 
गुंतवणूक म्हणून सोने चांदी खरेदी
आगामी काळात सोने व चांदीचे भाव वाढत राहणार असल्याने अनेक ग्राहक गुंतवणूक म्हणून सोने व चांदी खरेदी करीत आहे. तर काही ग्राहक मोठ्या प्रमाणावर सोने विकून चांदी घेऊ लागले आहेत. बाजारात चांदी उपलब्ध नसल्यामुळे चांदीची ताटे, चांदीचे ग्लास अशा वस्तू खरेदी करीत आहे. भाव वाढले तरी सुध्दा दिवाळीत सोने व चांदी विकत घ्यायची आहे, अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केली आहे. दिवाळीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोने १ लाख २८ हजार ५०० असून यात जीएसटी आणि मेकिंग चार्जेस जोडल्यास सोने खरेदीचे बील जवळपास १ लाख ४० हजारावर पोहोचते.
दोन दिवसात १५० कोटींचा व्यवसाय
’धनत्रयोदशी’ च्या दिवशी देशभरात टन तर रविवारी १५ टन सोने विक्री झाली आहे. gold-and-silver-prices येत्या २३ ऑक्टोबरपर्यंत सोने चांदीच्या खरेदीसाठी ज्वेलर्संकडे वर्दळ कायम राहणार असून दोन दिवसात १५० कोटींचा व्यवसाय झाला आहे. तर दिवाळीतील ८ दिवसात नागपूरच्या सराफा बाजारात जवळपास ३०० कोटींचा व्यवसाय होण्याची शक्यता सराफा असोसिएशनने व्यक्त केली आहे.
Powered By Sangraha 9.0