हनुमान नगरात गोपुजन व हनुमान जयंती उत्सव

20 Oct 2025 17:35:29
नागपूर,
Hanuman Nagar हनुमान नगर स्थित त्रिकोणी मैदान येथे वसुबारस निमित्त गोपुजन उत्साहात पार पडली. कार्यक्रमात हनुमान नगर संघचालक ज्ञानेश्वर बालपांडे, मोहन झरकर, पियुष अग्रवाल तसेच मातृशक्ती, बालगोपाल आणि ज्येष्ठ नागरिक यांचा मोठ्या संख्येने उत्साहपूर्ण सहभाग होता. कार्यक्रमापूर्वी सकाळी कार्तिक महिन्यातील काकड आरती पार पडली. गोपुजन आणि आरती नंतर सर्व उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला.
 
 
Hanuman Nagar

सौजन्य: आशुतोष ठोंबरे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0