त्रिकोणी मैदानात हनुमान चालीसा व स्तोत्र पठन

20 Oct 2025 19:19:39
नागपूर,
Hanuman Chalisa हनुमान नगर स्थित त्रिकोणी मैदान येथे नरक चतुर्दशी आणि हनुमान पुनर्जन्म दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात श्री समर्थ रामदास रचित मारोती स्तोत्र आणि संत तुलसीदास रचित श्री हनुमान चालीसा उत्साहपूर्ण पठन करण्यात आले.
 
nagpur
 
कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व धर्मजागरण अखिल भारतीय परियोजना प्रमुख श्याम हरकरे, हनुमान नगर संघचालक ज्ञानेश्वर बालपांडे, तसेच ज्येष्ठ स्वयंसेवक गजानन पिलपिले उपस्थित होते. तसेच हनुमान नगरमधील मातृशक्ती, बालगोपाल आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Hanuman Chalisa अजनी भागाचे परिवार प्रबोधन श्री गिरीषजी हरकरे यांनी हनुमान पुनर्जन्माची महती सांगितली. पठनानंतर कार्यक्रमाचा समारोप आरती आणि प्रसाद वितरण करून करण्यात आला, ज्यामुळे सर्व उपस्थितांमध्ये उत्साहाची लहरी पसरली.
सौजन्य: आशुतोष ठोंबरे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0