विमानाच्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू

20 Oct 2025 09:15:07
हांगकांग,
Hong Kong plane crash, दुबईहून आलेले एक मालवाहू विमान सोमवारी पहाटे हांगकांग आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरून थेट समुद्रात कोसळले. या भीषण अपघातात दोन ग्राउंड स्टाफ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, विमानातील चार क्रू सदस्यांना सुखरूप वाचवण्यात आले आहे.
 
 

Hong Kong plane crash, 
विमानतळ Hong Kong plane crash, प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सकाळी सुमारे ३:५० वाजता घडली. दुबईच्या अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघालेल्या बोईंग ७४७ मालवाहू विमानाने हांगकांगमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला असता, ते धावपट्टीवरून घसरले आणि पुढे जाऊन समुद्रात पडले. एअरएसीटी (AirACT) या तुर्की मालवाहू कंपनीकडून हे विमान एमिरेट्स स्कायकार्गोच्या वतीने उड्डाण करत होते.अपघातानंतर तातडीने बचावकार्य राबवण्यात आले. विमानातील चार क्रू सदस्यांना सुखरूप बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, धावपट्टीजवळ काम करणाऱ्या एका ग्राउंड व्हेईकलमध्ये अडकलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आली आहे.
 
 
या दुर्घटनेमुळे  Hong Kong plane crash,  हांगकांग विमानतळावरील उत्तरी धावपट्टी तात्काळ बंद करण्यात आली असून, इतर दोन धावपट्ट्या मात्र कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत. हांगकांग आंतरराष्ट्रीय विमानतळ हा आशिया खंडातील अत्यंत वर्दळीचा विमानतळ मानला जातो. त्यामुळे या अपघातामुळे काही काळासाठी उड्डाण सेवांवर परिणाम झाला.दरम्यान, हांगकांगच्या नागरी उड्डाण विभागाने या अपघाताची गंभीर दखल घेतली असून, संबंधित एअरलाइन आणि अन्य यंत्रणांशी समन्वय साधून तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी उतरताना विमानाच्या नियंत्रण प्रणालीत बिघाड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हा अपघात अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या विमानतळावर घडल्यामुळे विमान वाहतुकीच्या सुरक्षेबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामुळे हवाई वाहतुकीतील नियम आणि संरचनात्मक उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा पुनरावलोकन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Powered By Sangraha 9.0