लक्ष्मी पूजनासाठी वस्त्रालंकाराने सजल्या मूर्तीं

20 Oct 2025 18:38:20
नागपूर, 
lakshmi-puja-2025 दिवाळी हा सुख-समाधानाची कामना करण्याचा उत्सव. देवी लक्ष्मी हे त्याचे स्वरूप समजून दिवाळीला लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा केली जाते. मंगळवारी असलेल्या लक्ष्मी पूजनासाठी चितारओळी परिसरात देवीच्या मूर्तीची खरेदी करण्यासाठी दिवसभर नागरिकांची लगबग सुरू हाेती. सुरेख अशा विविध आभूषणांनी नटलेल्या मूर्ती सर्वांचेच लक्ष्य वेधून घेत आहेत.
lakshmi-puja-2025
 
मार्केटमध्ये 200 रुपयांपासून तर 5 हजारापर्यंतच्या मूर्ती विक्रीस उपलब्ध आहेत. यामध्ये वस्त्रालंकार केलेल्या आणि स्टोन आणि साेनेरी दागिन्यांनी सजलेल्या मूर्तींना विशेष मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. पीओपीवरील बंदी मागे घेतल्याने यंदा मूर्तींच्या किमती कमी झाल्याचे विक्रेते सांगतात. lakshmi-puja-2025 कमळावर विराजमान असलेल्या मूर्ती खरेदीला पसंती असल्याचेही दिसून येत आहे.
 
पितळी मूर्ती रंगविण्याची लगबग
अनेकांकडे लक्ष्मीच्या पारंपारिक पितळी मूर्तीची पूजा केली जाते. lakshmi-puja-2025 त्या मूर्तींना रंगविण्यासाठी खास चितारओळीत आणले जाते. लक्ष्मी पूजनाचा एकच दिवस बाकी असल्याने या मूर्ती रंगविण्यासाठी अनेक जण घेऊन आले हाेते. त्या रंगवून देण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू होती. यासाठी विशेष ऑईल पेंट वापरला जात असल्याचे मूर्तिकार सुनील सूर्यवंशी यांनी सांगितले.
देवीचे पारंपरि कफोटोही विक्रीला
पूर्वी लक्ष्मीपूजनाला गजलक्ष्मी स्वरूपातील देवीचे फाेटाे विक्रीला असायचे. त्याचीच पूजा केली जात असे. परंतु काही वर्षांत मूर्तीची पूजा करण्याची पद्धती प्रचलित झाली असली तरी फोटाेची मागणीही केली जाते. उलट्या छत्रीमध्ये हे ाेटाे आजही पारंपरिक पद्धतीने विकले जातात.
 
लक्ष्मीचे प्रतिरूप केरसुणी
घराची स्वच्छता करणाऱ्या केरसुणी अथव्या फड्याला लक्ष्मीचे प्रतिरूप समजले जाते. lakshmi-puja-2025 त्यामुळे दिवाळीत एक तरी फडा घेतला जाताे. खजुरांच्या पानाचे फडे तयार करणारे माेजकेच लाेक आता राहिले आहे. हेच म्हातारे हात चितारओळीत फडे तयार करण्यात गुंतले होते.
Powered By Sangraha 9.0