कफ परेडमध्ये अग्नी तांडव! आगीत होरपळून युवकाचा मृत्यू

20 Oct 2025 09:39:35
मुंबई,
Khop parade fire accident कफ परेड येथील मच्छिमार नगर परिसरात आज पहाटे एका चाळीत भीषण आग लागल्याने एक गंभीर दुर्दैवी घटना घडली आहे. सुमारे पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत १५ वर्षीय यश खोत या मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर आणखी तीन जखमी झाल्याच्या वृत्तांनी परिसरात चिंता आणि खळबळ उडाली आहे.
 
 

Khop parade fire accident  
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावर असलेल्या मच्छिमार नगर येथील एका चाळीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. आग लग्नाला इलेक्ट्रिक वाहनांच्या तीन बॅटर्‍या, घरातील वायरिंग आणि विविध वस्तूंनी पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आग इतकी तीव्र होती की, १०x१० फुटांच्या लहान जागेत ती भीषण तांडव घडवत होती.आगीची त्वरित माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस आणि BEST कर्मचारी तत्परतेने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून आगीतून चार जणांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये १५ वर्षीय यश खोत या तरुणाला त्वरित सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
 
 
जखमी Khop parade fire accident झालेल्यांमध्ये देवेंद्र चौधरी (वय ३०), विराज खोत (वय १३) आणि संग्राम कुर्णे (वय २५) यांचा समावेश आहे. देवेंद्र चौधरी यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर विराज आणि संग्राम यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.मुंबई अग्निशमन दलाने सुमारे तासाभराच्या कष्टाने आग विझवली असून, सध्या परिसरात कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आग लागण्याच्या कारणांबाबत अधिक तपास सुरू असून, प्राथमिक चौकशीत इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटर्‍यांमुळे आग भडकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
 
 
ही घटना मच्छिमार नगर परिसरात मोठ्या धक्क्याचे कारण ठरली असून, स्थानिक रहिवाशांमध्ये चिंता आणि दु:खाचे वातावरण पसरले आहे. अधिक तपास आणि पुढील माहिती मिळताच अधिकृत निवेदन देण्यात येईल, असे महानगरपालिकेचे अधिकारी यांनी सांगितले आहेत.
Powered By Sangraha 9.0