वर्धा,
kojagari-pournima-festival-of-sevankur समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने २००८ पासून सेवांकुर हे वैद्यकीय विद्यार्थ्यांचे संघटन समाजामध्ये कार्य करीत आहे. सेवा संस्कार आणि संपर्क या त्रिसुत्रींचा अंगीकार करून समाजातील शेवटच्या घटकास मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम १७ वर्षांपासून सेवांकुर करीत आहे. सेवांकुर कार्यकर्त्यांचे अनौपचारिक मिलन तसेच एकमेकांप्रती सौहार्दाचे जागरण व्हावे, या दृष्टीने सेवांकुरमध्ये कोजागरी पौर्णिमेचा उत्सव नित्य उपक्रम म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. सेवांकुर वर्धा विभागाचा कोजागरी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय सालोड हिरापूर येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमास सेवांकुर ट्रस्ट नागपूरचे सचिव डॉ. विलास तुराणकर, महात्मा गांधी आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. भरत राठी, डॉ. वैभव अंजनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमांमध्ये शंभर सेवांकुर कार्यकर्ता तसेच ३० अभ्यागतांची उपस्थिती होती. वैष्णवी भांडेकर तसेच सिद्धी काळे यांनी सेवांकुरची आजवरची जडणघडण विशद केल्यानंतर वर्धा विभाग संयोजिका राजेश्वरी गावंडे यांनी प्रास्ताविक केले. साक्षी चापके आणि अनिशा बोराडे यांनी सेवांकुरमध्ये काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव विशद केला. kojagari-pournima-festival-of-sevankur या निमित्ताने संस्कार भारती वर्धेच्या चमूने सादर केलेला हम करे राष्ट्र आराधन हा राष्ट्रभतीपर गीतांचा बहारदार कार्यक्रम आकर्षण बिंदू ठरला. यशस्वीतेसाठी डॉ. गौरव सावरकर, डॉ. अनिता वंजारी, डॉ. अमोल देशपांडे यांनी सहकार्य केले. संचालन अमित महाजन व सायली इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन श्रावस्ती सुखदेवी यांनी केले.