तभा वृत्तसेवा मारेगाव,
Marda फिस्की जंगलालगत ठेक्याने केलेल्या शेतात वन्यप्राण्याचा उपद्रवापासून पिकांचे रक्षण करण्याकरिता लावलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मार्डी येथे रविवार, 19 ऑक्टोबरला उघडकीस आली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृतकाचे नाव श्यामसुंदर उद्धव कुमरे (वय 33) असे आहे. श्यामा उर्फ श्यामसुंदर हा मार्डी शिवारात शेती भाड्याने करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. भाड्याने केलेली शेती फिसकी जंगलाला लागून असल्याने वन्यप्राण्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे.
त्यामुळे शेतमालाचे रक्षण करण्यासाठी श्यामा शनिवार, 18 ऑक्टोबरला सकाळी शेतात गेला. मात्र रात्री परत न आल्याने दुसèया दिवशी रविवारी शोधशोध केली असता श्यामा मृतावस्थेत आढळला. मृतक श्यामसुंदर कुमरेच्या मागे आई, पत्नी व दोन मुली आहेत. याबाबत मारेगाव पोलिस ठाण्यांतर्गत ठाणेदार श्याम वानखडे यांच्या मार्गदर्शनात जमादार दिगांबर किनाके अधिक तपास करीत आहेत.