जिव्हाळा परिवारसोबत आनंदातली दिवाळी

20 Oct 2025 13:49:07
नागपूर,
Nagpur News लहानपणी आई–बाबा आणि लेकरं एकत्र असतात; एकत्र हसणं, जेवण, सण आणि क्षण सर्व काही अनुभवायला मिळतात. या लहानपणीच्या स्मृतींना “जिव्हाळा” म्हणतात, जिथे किरकोळ गोष्टीवर भांडणं होऊन लगेच हसणं सुरू होते. पण काळ पुढे सरकतो, लेकरं मोठी होतात, आयुष्याची धावपळ वाढते आणि घराबाहेर जाऊन स्वप्नांना साकार करावं लागतं. अशा काळात ‘जिव्हाळा परिवार’ आपल्या सर्व पाखरांसोबत प्रेम, आपुलकी आणि साथ देत राहतो.
 
Nagpur News
 
या दिवाळी सणाला दान दात्यांनी आपल्या परिवारा सोबत कन्यांना सुद्धा आठवणीत ठेवून नवीन ड्रेसेस भेट दिल्या, ज्यामुळे सणाचा आनंद द्विगुणित झाला. Nagpur News उपस्थित मुलींना स्वतः पसंतीनुसार खरेदी करण्याची संधी मिळाली, आणि सोबत दिवाळीचा फराळही होता. लेकरांनी आनंदाने म्हणाले- “HAPPY DIWALI TO ALL. AND THANKS 🙏”. ‘जिव्हाळा परिवार’ या दोन शब्दांत किती प्रेम, आठवणी आणि ओलसर डोळे दडलेले आहेत, हे त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांवर दिसून येते.
सौजन्य: मीना पाटील, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0