अपघातात प्रशांत नांदेचा जागीच मृत्यू

20 Oct 2025 11:59:10
मारेगाव,
Prashant Nande accident, मारेगाव येथील काम आटोपून सालेभट्टी येथे दुचाकीने परत जात असताना झालेल्या अपघातात प्रशांत शंकर नांदे (वय 38, सालेभट्टी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, 17 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास सालेभट्टी गावाजवळील वळणावर घडला.
 

Prashant Nande accident, 
प्रशांत नांदे हे गाडीचे फायनान्स भरण्यासाठी मारेगाव येथे गेले होते. मारेगावहून आपल्या गावाकडे दुचाकीने परत जात असताना गावाजवळील वळण लक्षात न आल्याने त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला आदळले. यात प्रशांतला गंभीर दुखापत झाली.गावकèयांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ प्रशांत यांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रशांत नांदे यांच्यामागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने सालेभट्टी परिसरात हळहळ आहे.
Powered By Sangraha 9.0