स्वावलंबी खादी; अन्नपुर्णा आणि भाकरीसाठी लोणी देणारी : डॉ. उल्हास जाजू

20 Oct 2025 18:34:06
वर्धा, 
dr-ulhas-jaju गांधीजींनी खादीला अन्नपूर्णा म्हटले आणि जो काततो तोच परिधान करतो. जो परिधान करतो तोच काततो हा १९३४ साली मंत्र दिला. हा मंत्र शोषणमुती आणि शासनमुती दोन्हीचा संदेश देतो. स्वावलंबी खादी ही अन्नपुर्णा आणि भाकरीसाठी लोणी देणारी आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. उल्हास जाजू यांनी केले.
 
 
dr-ulhas-jaju
 
अखिल भारतीय चरखा संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त खादी मिशन सेवा ट्रस्ट आणि मुदित शिक्षण संस्था यांच्या संयुत वतीने तीन दिवसीय आयोजित राष्ट्रीय ऑनलाइन चर्चासत्रात ते प्रमुख वते म्हणून बोलत होते. यावेळी डॉ. पंकजकुमार सिंग, दिल्ली विद्यापीठाचे डॉ. राजीव रंजन गिरी, डॉ. महेश कुमार सिंग यांची उपस्थिती होती. १५ ऑटोबर रोजी झालेल्या सत्रात देशभरातील ८६ खादी संस्थांचे प्रतिनिधी, गांधीवादी कार्यकर्ते, खादीप्रेमी, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ. पंकजकुमार सिंग यांनी महात्मा गांधींनी २२ सप्टेंबर १९२५ रोजी पटणामध्ये अखिल भारतीय चरखा संघाची स्थापना केली होती. चरखा संघ हा सक्रियपणे काम करणारा संघ असावा, असेही ते म्हणाले. dr-ulhas-jaju डॉ. राजीव रंजन गिरी यांनी खादी वारशाचे वैभव आणि वर्तमानातील आव्हाने या विषयावर विचार व्यत केले. गांधींनी तिलक स्वराज फंडद्वारे चरखा घराघरात पोहोचवला आणि खादी स्वातंत्र्याचे प्रतीक बनली, असे सांगितले. डॉ. महेश कुमार सिंग यांनी खादीचे नाव घेताच गांधी, स्वातंत्र्यलढा आणि आझादी आठवते. खादीच्या मूलभावनेला धका न लावता आपण चरखा आणि करघ्यात तांत्रिक सुधारणा कराव्यात, असे सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. पुष्पेंद्र दुबे यांनी केले तर आभार प्रा. नृपेंद्र प्रसाद मोदी यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0