सरस्वती प्रशिक्षण केंद्रात रांगोळी स्पर्धा

20 Oct 2025 15:20:17
नागपूर,
Saraswati Training Center शंकरनगर स्थित सरस्वती शाळेतील ईसीसीई प्रशिक्षण केंद्रात दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत शिक्षक प्रशिक्षणार्थींनी रांगोळी स्पर्धा आयोजित केली. स्पर्धेचा उद्देश संकल्पना दर्शविण्यासाठी 3D वस्तूंचा वापर करणे होता. सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळ्या काढून परिसर सुशोभित केला.
 
Rangoli Competition
 
स्पर्धेत पहिले पारितोषिक स्वाती सिडाम, दुसरे पारितोषिक स्नेहा अनुराज, आणि तिसरे पारितोषिक श्रद्धा मिश्रा यांना मिळाले. तसेच शीतल डेकाटे आणि सारिका गाडीकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. Saraswati Training Center विद्याशाखा वीणा नारायणन, लक्ष्मी मुंगेला आणि जानकी अय्यर यांनी सहभागींना प्रोत्साहन दिले. स्पर्धेचे परीक्षण आणि बक्षिस वितरण वैशाली जगताप आणि अनघा पेंडके यांनी केले. एसआयईएस व्यवस्थापन सदस्यांनी सहभागींचे कौतुक केले.
सौजन्य: अनघा पेंडके, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0