दादा रामचंद बाखरू महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस

20 Oct 2025 15:44:39
नागपूर,
Dada Ramchand Bakhru College दादा रामचंद बाखरू सिंधू महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला होता. कार्यक्रमाची भूमिका डॉ. जयंत वाळके यांनी सांगितली. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात ‘बियॉन्ड द टेक्स्ट’ नावाने विद्यार्थी व शिक्षकांसाठी वाचन कट्टा सुरू करण्यात आला.
 
Dada Ramchand Bakhru College
 
प्राचार्य डॉ. विश्वजीत पेंडसे यांनी थोर संशोधक मायकल फॅरेडे यांची कथा सांगितली आणि व्यक्तिमत्वाच्या विविध पैलू तसेच निरंतर शिकण्याची जीद्द याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर डॉ. मिलिंद शिनखेडे यांनी फ्रेंच तत्वज्ञानी देकार्ता यांची कथा सांगितली व स्वयंप्रज्ञा आणि स्वपरीक्षण याविषयी विचार मांडले. Dada Ramchand Bakhru College याप्रसंगी डॉ. तेवानी, डॉ. चंदना इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथालयाच्या वतीने निवडक पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. डॉ. वाळके यांनी सांगितले की, प्रत्येक महिन्याला एक नवीन पुस्तक वाचन व त्यावर मुक्त चर्चा या उपक्रमात पुढे राबविण्यात येईल.
सौजन्य: डॉ. मिलिंद शिनखेडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0