फुकटा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव

20 Oct 2025 18:09:01
आजनसरा, 
rss-vijayadashami राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फुकटा शाखेचा विजयादशमी उत्सव १६ रोजी साजरा करण्यात आला. यावेळी फुकटा येथील व्यावसायिक शुभम वानखेडे प्रमुख पाहुणे म्हणून तर रा. स्व. संघाचे वर्धा जिल्हा सहकार्यवाह त्रिशूल लोंढेकर प्रमुख वते म्हणून उपस्थित होते. व्यासपिठावर तालुका संघ चालक प्रशांत हिवरकर उपस्थित होते.
 

rss-vijayadashami 
 
यावेळी लोंढेकर यांनी संघ स्थापनेपासून संघाने आजवर केलेल्या कार्याची माहिती दिली. rss-vijayadashami संघ शताब्दी निमित्ताने संघाने समाजात, स्वदेशी, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता व नागरिक कर्तव्य या पंच परिवर्तनाने समाज उन्नत करायचा आहे असे लोंढेकर यांनी सांगितले. तत्पूर्वी स्वयंसेवकांनी गावातील मुख्य मार्गावरून घोषासह संचलन केले. या कार्यक्रमाला वासुदेवराव हारगोडे यांचे विशेष सहकार्य लाभले. संत भोजाजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्वत, आकाश पोहाणे, वसंत आंबटकर, भाग्येश देशमुख आदींसह मंडलातील स्वयंसेवक, गावातील प्रतिष्ठीत नागरिक, व मातृशती उपस्थित होती.
Powered By Sangraha 9.0