स्वरवेधतर्फे भव्य दिवाळी पहाट २०२५ सुरु

20 Oct 2025 14:30:01
नागपूर,
Swaravedh grand Diwali Pahat स्वरवेधतर्फे दरवर्षीप्रमाणे ५ दिवसिय भव्य दिवाळी पहाट २०२५ ची सुरुवात आज सकाळी सायंटिफिक सभागृहात झाली. दररोज एक वेगळी संकल्पना घेऊन भानुदास कुलकर्णी रसिकांसाठी सांगितिक मेजवानी सादर करणार आहेत. आज “भाव डोळ्यांचे” या विषयावर २५ गीते सादर झाली.
 
Swaravedh grand
 
कार्यक्रमात मंचावर आनंद मास्ते, परिमल वाराणसीवार, नरेंद्र कडवे, गौरव टाकसाळे, अमर शेंडे, अरविंद उपाध्याय, भानुदास कुलकर्णी, पंकज यादव, सुभाष वानखेडे, विक्रम जोशी, दिपक कांबळे यांनी संगीताची रंगत वाढवली. Swaravedh grand Diwali Pahat तर गायक कलावंत डॉ. मंजिरी वैद्य अय्यर, डॉ. शीला कुलकर्णी, लक्षती काजळकर भुसारी, श्रुती बाईवर गाडे, राधा ठेंगडी, साक्षी सरोदे, आदित्य सावरकर, पारिजात काळीकर आणि यश खेर यांनी विविध भावनांमधील गीते रसिकांसमोर सादर केली.
 
कार्यक्रमाचे निवेदन मुकुंद देशपांडे यांनी खुमासदार पद्धतीने केले. आजच्या सादरीकरणांमध्ये “निगाहे मिलाने को”, “दगाबाज रे”, “या डोळ्यांची दोन पाखरे”, “अखियान संग” या गाण्यांना रसिकांकडून विशेष दाद मिळाली. Swaravedh grand Diwali Pahat स्वरवेधतर्फे उद्या “भाव मनाचे” आणि परवा “भाव निसर्गाचे” या विषयांवर गीतांचे सादरीकरण होणार आहे. सर्व रसिकांना आमंत्रण आहे.

सौजन्य: स्वाती मोहरीर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0