लोकमान्य कॉन्व्हेंटमध्ये पारंपरिक दीपोत्सव

20 Oct 2025 17:33:22
नागपूर,
Lokmanya Convent गांधीनगर येथील लोकमान्य कॉन्व्हेंट (इंग्रजी माध्यम) शाळेत दीपोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. संपलेल्या परीक्षांनंतर विद्यार्थ्यांनी मंगल पोशाखात शाळेत प्रवेश करून उत्सवात आनंदाने सहभाग घेतला.
 
Lokmanya Convent
 
या दीपोत्सवाचे मुख्य आकर्षण होते किल्ले बनविण्याची स्पर्धा, ज्यात विद्यार्थ्यांनी कल्पकतेचा सुंदर आविष्कार केला. तसेच मुलींसाठी रांगोळी स्पर्धा, लहान विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील, शुभेच्छापत्र, तोरण आणि विविध प्रकारचे दिवे तयार करण्याचे उपक्रम आयोजित करण्यात आले होते. Lokmanya Convent शाळेच्या प्राचार्या संगीता लाडखेडकर आणि पद्मजा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांचे कौतुक केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. संपूर्ण शाळा दिव्यांच्या उजेडाने, रंगोळीच्या रंगांनी आणि मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी उजळून निघाली होती.
सौजन्य: मीनाक्षी देशपांडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0