'या योजनेमुळे' मिळणार इतके व्याज

22 Oct 2025 17:02:04
मुंबई,
Post Office भारतीय पोस्ट सेवेची रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना हा सर्वसामान्य लोकांसाठी आर्थिक बचतीचा एक लोकप्रिय आणि विश्वासार्ह पर्याय ठरला आहे. कमी जोखीम आणि नियमित बचतीच्या आधारावर भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करण्याचा हा मार्ग अनेकांसाठी उपयुक्त ठरतो. या योजनेत तुम्हाला सध्या वार्षिक 6.7 टक्के व्याज दर मिळतो, जे चक्रवाढ पद्धतीने तिमाही दर तिमाही वाढत राहते. त्यामुळे फक्त तुमच्या मूळ रकमेवरच नाही तर त्यावर मिळालेल्या व्याजावरही व्याज मिळते.
 

Post Office 
पोस्टाची आरडी Post Office योजना म्युच्युअल फंडच्या SIP प्रमाणेच दर महिन्याला थोडी थोडकी रक्कम गुंतवण्याची मुभा देते. यासाठी तुम्हाला मोठी रक्कम एकदाच गुंतवावी लागत नाही. तुम्ही इच्छित असलेल्या रकमेतून ₹100 प्रति महिना पासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि जमा रकमेची कोणतीही कमाल मर्यादा नाही. या योजनेत कालावधी किमान 5 वर्षांचा असतो, ज्याला तुम्ही पुढे आणखी 5 वर्षांसाठी वाढवू शकता.
 
 
जर तुम्ही प्रत्येक महिन्याला ₹5000 रक्कम 5 वर्षे गुंतवली तर एकूण ₹3,00,000 जमा होतील आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला अंदाजे ₹3,56,830 मिळतील. याचा अर्थ असा की, या पाच वर्षांत तुम्हाला जवळपास ₹56,830 चा फायदा होईल. तसेच, या योजनेमध्ये कोणतीही जोखीम नसल्यामुळे तुमचे पैसे संपूर्ण सुरक्षित राहतात.योजनेची आणखी एक खासियत म्हणजे अल्पवयीन मुलांचेही खाते आई-वडीलांच्या नावाने उघडता येते. 18 वर्षांच्या झाल्यावर त्यांना स्वतंत्रपणे खाते चालवण्याचा अधिकार मिळतो. या खात्यावर मोबाईल किंवा ई-बँकींगच्या माध्यमातून देखील व्यवहार करता येतात, ज्यामुळे सुविधा अधिक वाढते.या योजनेत तुम्हाला सातत्याने बचत करण्याचा आणि नियोजनाने आर्थिक सवलत मिळवण्याचा सुवर्णसंधी उपलब्ध होते. सरकारी हमीमुळे तुमच्या गुंतवणुकीची सुरक्षा सुनिश्चित होते, त्यामुळे हे पर्याय खास आर्थिक जोखमींपासून दूर रहाणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरतो.
 
 

योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
 
 
योजना: नॅशनल सेव्हींग्स रिकरिंग डिपॉझिट अकाऊंट
कालावधी: किमान 5 वर्षे (वाढवण्याचा पर्याय उपलब्ध)
किमान जमा रक्कम: ₹100 प्रति महिना
कमाल जमा रक्कम: मर्यादा नाही
व्याजदर: सुमारे 6.7% वार्षिक (तिमाही चक्रवाढ व्याज दर)
सुरक्षा: सरकारी योजना असल्यामुळे पूर्ण सुरक्षित व गॅरंटीड रिटर्न
 
 
एकंदरीत, Post Office पोस्टाची रिकरिंग डिपॉझिट योजना ही अशी सुरक्षित आणि सोपी गुंतवणूक योजना आहे, जी दीर्घकालीन बचतीसाठी आणि आर्थिक नियोजनासाठी उत्तम पर्याय ठरते. जर तुम्हाला नियमित पद्धतीने कमी जोखीमात पैसे जमा करायचे असतील तर ही योजना नक्कीच विचारात घेण्याजोगी आहे.
Powered By Sangraha 9.0