नागपूर,
276-cctv-cameras-at-railway-station दिवाळी आणि छटपूजेसाठी जाणार्या-येणार्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी वाढल्याचे पाहून सुरक्षेच्या अनेक करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासन, सुरक्षा दल तसेच पोलीस यांनी संयुक्त उपाययोजना चालविल्या आहेत. त्यानुसार, मुख्य रेल्वे स्थानकावर २७६ तर अजनी रेल्वे ३१सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून दोन नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहे. त्यातून गर्दीवर लक्ष ठेवले जात आहे.
प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे सुरक्षा दलाचे ७८ तसेच पोलिसांचे २८ कर्मचारी रेल्वे स्थानक परिसरात तैनात करण्यात आले आहेत. 276-cctv-cameras-at-railway-station मुख्य स्थानकासह अजनी रेल्वे स्थानक तसेच परिसरातील घडामोडी टिपल्या जात आहेत.