chandrapur-padwa लक्ष्मीपूजनच्या दुसर्या दिवशी म्हणजे, गोवर्धन पूजेला सकाळीच चंद्रपुरात रेड्यांच्या झुंजीची थरार नागरिक अनुभवतात. गेल्या 50 वर्षापासून ही परंपरा कायम असून, यंदाही बुधवारी सकाळी नेहरू नगरातील गवळी समाजबांधव ही प्रथा कायम ठेवली. रेड्यांच्या झुंजीचा हा थरार बघण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.
खरे तर, प्राणीप्रेमींना हे मान्य नसेल, पण काही परंपरा रुढ झालेल्या असतात आणि त्या तशाच जपल्या जातात. नेहरूनगर परिसरातील वेकोलिच्या ओव्हरबर्डनजवळील मोकळ्या मैदानात ही झुंज आयोजित करण्यात आली होती. chandrapur-padwa गोवर्धन पूजेनंतर समाजातील प्रमुखांच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरवात झाली. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ही प्रथा चालत असल्याचे आयोजकांनी सांगितले. ही झुंज बघण्यासाठी गवळी समाजबांधवांसोबतच इतरही लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या झुंजीमध्ये सहभागी होणार्या रेड्याला सजवून आणले जाते. रंगरंगोटी करून, पाठीवर आकर्षक नावे लिहून मैदानात उतरवले जाते. यंदा सरकार, खली, महाकाली, राजा असे नामाभिधान करून मैदानात आलेले हे रेडे जोरदार झुंजले. chandrapur-padwa ही झुंज सुरू असताना चारीबाजुने लोकांचा ओरडा सुरू असतो. रेडे आपापसात लढावे यासाठी त्यांना डिवचले जाते, लाठ्या घेऊन जवळ आणले जाते. अतिशय उत्कंठावर्धक अशी ही झुंज असते. यात जो रेडा पराभूत होतो, त्याच्यामागे गर्दी धावत जाते आणि त्याला सळो की पळो करून सोडले जाते.