त्रास सुरूच आहे, माझ्या मृत्यूसाठी पत्नी जबाबदार!

22 Oct 2025 12:46:55
बिदादी,
Bidadi Rewant Kumar committed suicide लग्नाला केवळ पाच महिने झालेले ३० वर्षीय तरुण रेवंत कुमार यांनी पत्नीच्या सततच्या त्रासामुळे आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात आणि सोशल मीडियावर मोठा धक्का निर्माण केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रेवंत कुमार हे अन्नामुडी गावाचे रहिवासी असून बिदादी येथे एका कंपनीत काम करतात. लग्नानंतर पत्नीच्या सततच्या त्रासाने त्यांना मानसिक त्रास सहन करणे अशक्य झाले आणि त्यांनी रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवले.
 
Bidadi Rewant Kumar committed suicide
 
 
महत्त्वाचे म्हणजे, मृत्यूपूर्वी रेवंतने व्हिडीओ बनवून पत्नीवर गंभीर आरोप केले. व्हिडीओमध्ये त्याने म्हटले की, सर्व जण ऐका, माझी पत्नी मला खूप त्रास देते आहे. पाच महिने झाले तरी त्रास कायम आहे. माझ्या मृत्यूसाठी माझी पत्नी जबाबदार आहे. तिच्यामुळे मी आत्महत्या करतो आहे. माझ्या मृत्यूनंतर तिच्या कठोर कारवाई व्हावी.
 
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहोचले, पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. पोलिसांच्या माहितीप्रमाणे लवकरच पत्नीला अटक केली जाईल. या घटनेने सामाजिक माध्यमांवर मोठी चर्चा सुरु झाली असून मानसिक त्रास आणि कौटुंबिक संघर्षाचे गंभीर परिणाम लोकांसमोर आणले आहेत.
Powered By Sangraha 9.0