डर्मेटोलॉजिकल सोसायटीचे ‘एमसीआय’ला निवेदन

22 Oct 2025 15:26:01
नागपूर, 
dermatological-societys अपात्र व अपंजिकृत व्यक्तींमार्फत त्वचारोग व सौदर्यविषयक उपचारांचा सुळसुळाट वाढला असून त्यांच्यावर तीव्र कारवाई करावी, अशी सुस्पष्ट मागणी विदर्भ र्डेटोलॉजिकल सोसायटीच्या एका शिष्टंडळाने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांना एका निवेदनातून केली. या  भेटीदरम्यान प्रतिनिधींनी अनेक अशा घटनांचा उल्लेख केला जिथे प्रशिक्षण न घेतलेले व वैद्यकी क्षेत्राशी संबंध नसलेल्या संस्था, व्यक्ती लेझर थेरपी, बोटॉक्स, फिलर्स व रासायनिक प्रक्रियांसारखे अति आक्रक त्वचारोग उपचार करीत आहेत.
 
 
dermatological-societys
 
या प्रकारांमुळे रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणा होऊ शकतो. जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. dermatological-societys त्वरित नियामक कारवाई व जनजागृती करण्याची मागणी केली. डॉ. विंकी रुघवानीांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल या गंभीर परिस्थितीची पूर्ण जाणीव ठेवून आहे व कायदेशीर चौकटीत राहून अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल, अशी ग्वाही दिली. जनजागृतीसाठी कौन्सिलने ‘नो यूअर डॉक्टर क्यूआर कोड’ ही मोहीम सुरू केली आहे. याद्वारे नागरिकांना वैद्यकी व्यावसायिकांचे प्रमाणपत्र व नोंदणीची स्थिती महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासता येते. अध्यक्ष डॉ. आसरा खुमुशी, डॉ. विक्रांत सावजी, डॉ. जेरिल बानाईत व इतर डॉक्टर्स उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0